Posts

Showing posts from May 14, 2023

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात रायगड काँग्रेस ने साजरा केला कर्नाटक मधील विजयाचा जल्लोष!

Image
  जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात  रायगड काँग्रेस ने साजरा केला कर्नाटक मधील विजयाचा जल्लोष! उरण - (विठ्ठल ममताबादे ) अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते मा. राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेमधे सर्व सामान्यांचे प्रश्न समजून घेतले त्याचा  परिणाम दिसू लागला आहे.सर्व सामान्य नागरिकांना कळून चुकलं आहे की, लोकशाही वाचवायची असेल तर देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही. कर्नाटक पासून याची सुरुवात झाली. कर्नाटकी जनतेने काँग्रेस पक्षाला बहुमत दिले. हाच परीवर्तन आगामी निवडणुकांत सुद्धा दिसून येईल. कर्नाटक तो झाँकी है दिल्ली अभी बाकी  है.  कर्नाटकात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाचा आनंद रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रजी घरत यांच्या नेतृत्वात उलवे काँग्रेस पक्ष कार्यालयात पेढे वाटून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

गवळी समाज म्हसळा शाखेचा १४ मे राेजी २५ वा वर्धापन दिन साेहळ्यास पास्टी-म्हसळा येथे हजाराेंच्या संख्येने उपस्थित रहा - शांताराम गायकर

Image
  गवळी समाज म्हसळा शाखेचा १४ मे राेजी २५ वा वर्धापन दिन साेहळ्यास पास्टी-म्हसळा येथे हजाराेंच्या संख्येने उपस्थित रहा - शांताराम गायकर म्हसळा (प्रतिनिधी) : म्हसळा तालुक्यातील दुर्गम खेडेगावात गवळी समाज हा बहुतांशी प्रमाणात राहत आहे. येथील अनेक लोक हि मुंबईवर अवलंबून असतात. गरीब आणि गरजू अश्या या गवळी समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट हि शिखर संस्था कार्यरत आहे. अनेक तालुक्यात अनेक शाखा या ट्रस्टच्या आहेत. मात्र म्हसळा तालुक्यात म्हणावा तसा विकास या समाजाचा झालेला दिसत नाही. येथील चाकरमानी हे मुंबईत नोकरी करीत कसे तरी आपले कुटुंबाचा उदर्निवाह चालवत असतात. मात्र तरीही या समाजाकडून अनेक समाजपयोगी कार्यक्रम राबविले जातात. समाजासाठी म्हसळा शाखेचे अनेक गवळी समाज कार्यकर्ते हे अहाेरात्र मेहनत करीत झटत असतांना दिसत अाहेत.  अशातच या ट्रस्टच्या म्हसळा शाखेचा २५ वा वर्धापन िदन साहळा हा मु. पास्टी - म्हसळा तालुक्यात येथे हाेत अाहे. या कार्यक्रमासाठी स्थानिक अध्यक्ष श्री. रामदास िरकामे हे प्रचंड मेहनत घेत अाहेत. अापल्या लाेकांनी जास्त जास्त सहभागी हाेऊन समाजाच्या भविष्यासाठी एक