रयत शिक्षण संस्थेच्या विकासात भरीव योगदान देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने हृद्य गौरव
रयत शिक्षण संस्थेच्या विकासात भरीव योगदान देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने हृद्य गौरव सातारा (हरेश साठे) कर्तृत्व, दातृत्व आणि समाजकारणाला महत्व देत सामाजिक जाणीव व बांधिलकी जोपासणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेला तब्बल ०८ कोटी ८६ लाख रुपयांची देणगी दिली. त्याबद्दल त्यांचा रयत शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेेेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज (मंगळवारी, दि. ०९) सातारा येथे कर्मवीर भूमीत समारंभपूर्वक हृद्य गौरव करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६४ वा पुण्यतिथी सोहळा सातारा येथे अनेक मान्यवर व हजारो रयत सेवकांच्या उपस्थितीत पार पडला. थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी सातत्याने भरीव मदत करून या संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच मोलाचा हातभार लावला आहे. रयत शिक्षण संस्था मातृसंस्था माणून सदैव रयतेच्या विकासासाठी कार्य करणारे लोकनेते रामशे