महाराष्ट्रात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होणार? 22 जिल्हे प्रस्तावित, जाणून घ्या सविस्तर रायगड मधून – महाड जिल्हयाची हाेणार निर्मिती, ## श्रीवर्धन मतदार संघामध्ये हाेणार बदल
महाराष्ट्रात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होणार ? 22 जिल्हे प्रस्तावित , जाणून घ्या सविस्तर रायगड मधून – महाड जिल्हयाची हाेणार निर्मिती, श्रीवर्धन मतदार संघामध्ये हाेणार बदल रायगड मत (प्रतिनिधी) : राज्यात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होऊ शकतात . कारण राज्यात आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे . 1 मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांचं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं . अनेक जिल्हे हे लोकसंख्या आणि आकाराच्यादृष्टीने मोठे होते . मात्र प्रशासकीय कामासाटी नागरिकांची गैरसोय होऊ लागली . त्यानंतर आजपर्यंत राज्यात नवीन 10 जिल्ह्यांची भर पडून ते 36 जिल्हे झाले . मात्र अजूनही गावातून येणाऱ्या नागरिकाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्ण दिवस प्रवासात जातो . त्यामुळे आता आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे . Raigadmat.page राज्यात पहिल्यांदा 26 जिल्हे होते ठाणे , कुलाबा ( आताचे रायगड ), रत्नागिरी , बृहन्मुंबई , नाशिक , धुळे , पुणे , सांगली , कोल्हापूर , सोलापूर , औरंगाबाद ( छत्रपती संभाजीनगर ), बीड परभणी , उस्मानाबाद , नांद