Posts

Showing posts from April 13, 2023

श्रीवर्धन तालुक्यातील अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर

 श्रीवर्धन तालुक्यातील अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर श्रीवर्धन सोपान निंबरे; तालुक्यात शहरासह अनेक ठिकाणी अवैधरित्या गावठी दारूची निर्मिती व विक्री राजरोसपणे सुरू आहे. मात्र, उत्पादन शुल्क विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तालुक्यात अवैध रीतीने गावठी दारूधंदे जोरात सुरू आहेत. एखादी कारवाई केल्यानंतर हे धंदे पुन्हा सुरू कसे होतात, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या गावठी दारू धंद्यांमुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. गावठी दारूचा सर्वात जास्त गरीब, हातावर कमवणारे व आदिवासी समाजावर होत आहे. यामुळे कौटुंबिक हिंसाचार वाढले आहेत. तसेच ही अवैध गावठी दारू रासायनिक प्रक्रिया करून बनवण्यात येते. त्यामुळे त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. म्हणूनच हे अवैध गावठी दारू धंदे बंद करावेत, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. येथील आसपासच्या परिसरामध्ये गावठी दारू गाळली जाते. गावठी दारूच्या अवैध विक्रीवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांनादेखील आहेत. परंतु, अवैध मद्य वाहतूक रोखण्यात अद्याप समाधानकारक कारवाई झालेली दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. व्यसनाधीनता आणि गरिबी यामुळे गावठी,

थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर प्लब्लिक स्कुल येथे आयोजित कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर प्लब्लिक सीबीईसी स्कुल कामोठेचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी, पीआरओ बाळासाहेब कारंडे यांनी अभिवादन केले.

Image
  थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर प्लब्लिक स्कुल येथे आयोजित कार्यक्रमात  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर प्लब्लिक सीबीईसी स्कुल कामोठेचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी, पीआरओ बाळासाहेब कारंडे यांनी अभिवादन केले. 

पिण्याच्या पाण्याची नवीन जोडणी # 'कुस्त्यांचे जंगी सामने' # आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून करंबेली गावातील रस्त्याची आणि पाण्याची समस्या दूर करणार -अरुणशेठ भगत

Image
पिण्याच्या पाण्याची नवीन जोडणी पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पिण्याच्या पाण्याची नवीन जोडणी घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत नवीन १४ इंचाची पाईप लाईन मार्केट यार्ड येथे असलेल्या पाण्याच्या टाकीला जोडण्यात येणार आहे. या पाईप लाइन टाकण्याच्या विकासकामाचे भुमीपूजन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे. या नागरिकांना भविष्य काळात पाण्याचा तुटवडा भासू नये या कारीता अमादार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याच्या संदर्भातील अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. त्याअंतर्गत शहरातील मार्केट यार्ड येथे अमृत योजने अंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या पाण्याच्या टाकीसाठी एमजेपीकडून नवीन पाण्याचे कनेक्शन घेण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्यावतीने नवीन १४ इंचाची पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु झाले असून या कामाचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याहस्ते भुपीपूजन झाले. या पाण्याच्या पाईप लाईनमुळे कल्पतरू परीसरात असणाऱ्या अनेक सोसायट्य

राज्यातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक २०२२ स्पर्धेचा निकाल जाहीर; राज्यस्तरीय स्पर्धेत 'दीपावली' तर जिल्हास्तरीय स्पर्धेत 'साहित्य आभा' ठरले मानकरी

Image
राज्यातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक २०२२ स्पर्धेचा निकाल जाहीर; राज्यस्तरीय स्पर्धेत 'दीपावली' तर जिल्हास्तरीय स्पर्धेत 'साहित्य आभा' ठरले मानकरी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाला ०१ लाख रुपये, जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रुपयांचे बक्षिस पनवेल(प्रतिनिधी) शैक्षिणक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत 'दीपावली' अंकाने तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत 'साहित्य आभा' य दिवाळी अंक प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत, अशी माहिती श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (सोमवार, दि. १० एप्रिल) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस श्री. रामशेठ ठाकूर सा