विदेशातून पनवेल मध्ये येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करा-प्रितम म्हात्रे*
विदेशातून पनवेल मध्ये येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करा-प्रितम म्हात्रे* "रुग्ण वाढायच्या अगोदर योग्य त्या उपाययोजना करा" पनवेल : महाराष्ट्रामध्ये कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंखे नुसार पनवेल महानगरपालिकेने योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे यांनी मागणी करताना सांगितले आहे की , गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर मुंबईत कोरोना रूग्णसंख्येत होत असलेली वाढ लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारीचा वेग वाढवला आहे.कोरोनाचा धोका वाढला आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मास्क वापरण्याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. तसेच राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर 1.82 टक्के आहे. राज्यात एकूण 3532 सक्रिय रुग्ण होते. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण सर्वाधिक आहे. यात पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा कोल्हापूर या सहा जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सा