Posts

Showing posts from March 31, 2023

पिलाई कॉलेज पनवेल येथील अभिषेक केशव सूर्यवंशी या विद्यार्थ्याने संपादित केली इंजिनीरिंगची पदवी

Image
 पिलाई कॉलेज पनवेल येथील अभिषेक केशव सूर्यवंशी या विद्यार्थ्याने संपादित केली इंजिनीरिंगची पदवी  पनवेल (जितेंद्र नटे)       पनवेल येथील मुंबई विद्यापीठाचे महात्मा एजुकेशन सोसायटीचे पिल्लाई इंजिनिर कॉलेज मध्ये नुकताच दीक्षांत समारंभ पार पडला. या समारंभात अनेक विद्यार्त्यांना कुलगुरू दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. महात्मा एजुकेशन सोसायटीचे पिल्लाई कॉलेज असून पनवेल मध्ये नावाजलेल्या इंजिनीरिंग कॉलेजमधील एक मानले जाते.     या दीक्षांत समारंभामध्ये मूळचा परभणीच्या मात्र पनवेल येथे राहत असणाऱ्या अभिषेक केशव सूर्यवंशी या विद्यार्थ्याने घवघवीत यश मिळविले आहे. त्याने म्यॅख्यानिकल इंजिनीरिंग मधून पदवी प्राप्त केली असून त्यामुळे संपूर्ण तालुक्यात तसेच पनवेल मध्ये त्याचे कौतुक करण्यात येत आहे. आपल्या मुलाने इंजिनीरिंग पदवी प्राप्त केल्यामुळे त्यांचे वडील केशव सूर्यवंशी आणि आई महानंदा केशव सूर्यवंशी यांना कमालीचा आनंद झाला आहे. मुलगा इंजिनीर व्हावा यासाठी आई वडिलांनी खूप मेहनत घेतली होती. प्रचंड मेहनत घेऊन मुलाने पदवी प्राप्त केल्यामुळे घरी आनंदाचे वातावरण आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

Image
मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी       पनवेल(प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज(दि. ३० मार्च) खारपाडा टोल प्लाझा येथे केले.        कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी ४२. ३००कि.मी. आणि खर्च २५१. ९६  कोटी) या रस्त्याचे काँक्रिटीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी राजेवाडी फाटा ते वरंध गाव (लांबी १३ कि.मी. आणि खर्च १२६. ७३ कोटी) व राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द (लांबी ८. ६० कि.मी. आणि खर्च ३५. ९९ कोटी ) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण ६३. ९०० किलोमीटर लांबी व एकूण ४१४. ६८ कोटी रुपये खर्च असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम त्यांच्या हस्ते पनवेल तालुक्यातील खारपाडा टोल प्लाझाजवळ संपन्न झाला, त्यावे