Posts

Showing posts from March 22, 2023

माजी नगरसेविका सुशीला जगदिश घरत राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

Image
  माजी नगरसेविका सुशीला जगदिश घरत राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित  पनवेल(प्रतिनिधी) सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुशीला जगदिश घरत यांना पालघर जिल्हयातील भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने 'राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.  विरार येथील भाऊसाहेब वर्तक सभागृहात झालेल्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि मानाचा फेटा परिधान करून त्यांचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश भोईर, सचिव अंकुश भोईर यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुशीला घरत यांना पूर्वीपासूनच समाजसेवेची आवड असल्याने त्यांच्याकडून विविध समाजोपयोगी उपक्रमे होत असतात. विविध प्रश्न मार्गी लावण्यात त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांच्याकडून होत असते त्यामुळेच त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले असून त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. 

सीकेटी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र विधान मंडळ प्रत्यक्षण भेट

Image
  सीकेटी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र विधान मंडळ प्रत्यक्षण भेट राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले मार्गदर्शन  पनवेल(हरेश साठे)  तरुणांचे राष्ट्र, जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी बहुविध बिरुदे असणाऱ्या देशातील तरुणांमध्ये संसदीय लोकशाहीच्या मूल्यांचे रोपण करण्यासाठी तथा राज्यविधिमंडळाच्या विधीनिर्मिती प्रक्रियेबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स  अँड   सायन्स कॉलेज ,  न्यु पनवेल (स्वायत्त) च्या राज्यशास्त्र विभागातील ४७ विद्यार्थी आणि ०२ प्राध्यापक यांच्या चमूने  सोमवारी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला भेट दिली.             महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ताफा दुपारी ०३ वाजता विधानमंडळ परिसरात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री. रवींद्र चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानी विद्यार्थ्यांनी काही वेळ विश्रांती व अल्पोपहार घेतल्यानंतर दुपारी ठीक ०३:४५ वाजता विधानभवनाच्या परिसरात विद्यार्थ्