राज्याचा सर्व समावेशक असा अर्थसंकल्प सादर झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
पनवेल (प्रतिनिधी) राज्याचा सर्व समावेशक असा अर्थसंकल्प सादर झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. त्याचबरोबरीने त्यांनी पनवेल, उरणसह रायगड जिल्हयाला पुढील काळात आवश्यक असलेल्या बाबींचा उल्लेख करत तशी मागणीही यावेळी केली. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सभागृहात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रथम म्हंटले कि, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराला आदर्श म्हणून शिरोधार्य मानून या महाराष्ट्राचा या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान, ओबीसी, आदिवासी, मागासवर्गीय आणि सर्व समाज घटकांचा विकास घडवण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरु आहे. एकीकडे शाश्वत शेती तर दुसरीकडे युवकांच्या हाताला काम देण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल, पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी या महाराष्ट्राचा जो पंचतीर्थ असा अर्थसंकल्प मांडलाय त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे मी अभिनंदन करतो आणि अ