Posts

Showing posts from March 6, 2023

एका उद्योजिकेच्या हस्ते इतर उद्योजिका महिलांचा सन्मान.

Image
  एका उद्योजिकेच्या हस्ते इतर उद्योजिका महिलांचा सन्मान. उरण  (विठ्ठल ममताबादे ) "एक महिला उद्योजक बनली तर तिच्या मुळे इतर महिला देखील उद्योजिका होतात" या उक्तीप्रमाणे उरण मधील उद्योजिका पूनम पाटेकर यांनी ऑरगॅनिक  सॅनिटरी नॅपकिन्स चा तीन वर्षापूर्वी व्यवसाय चालू केला.पण हा एक व्यवसाय म्हणून नव्हे तर एक सामाजिक कार्य म्हणून त्यांनी हा वसा  उचलला.आणि मोफत डेमो च्या माध्यमातून घराघरात,शाळा,सोसायटी,बचत गट ,महिलांचे आयोजित कार्यक्रमांमधून मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन्स बद्दल जनजागृती करण्यास सुरुवात केली आणि काही महिलांनी देखील या कार्यात खारीचा वाटा उचलला आणि हा व्यवसाय करण्यास इच्छा दर्शवली आणि जोरदार पणे आपापल्या परीने व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली.त्यांच्या या कामाचे कौतुक आणि सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोखरण गल्ली, म्हातवली, उरण येथे सन्मान सोहळा पार पडला. पूनम पाटेकर यांनी तुळशीचे रोप देऊन उद्योजिका असलेल्या महिलांचा सन्मान केला.आणि त्यांना व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी भारत

सर्पमित्र श्रावणी वानखेडे.

Image
सर्पमित्र श्रावणी वानखेडे ही विंधने, तालुका उरण  जिल्हा रायगड येथील रहिवाशी असून गेल्या  2 वर्षा पासून केअर ऑफ नेचर या पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी संस्थे मध्ये कार्यरत आहे.श्रावणी वानखेडे या निसर्ग प्रेमी, पर्यावरण प्रेमी आहेत. निसर्गातील प्राणी पशु पक्षी यांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.सापांना पकडून त्यांना त्यांच्या मूळ आदिवासात मुक्त करण्याचे धाडसी काम श्रावणी करत आहे. एक स्त्री असून देखील ती हे काम न घाबरता निस्वार्थी वृत्तीने करत आहे.तरी काही लोक बोलतात मुली हे करू शकणार नाही ते करू शकणार नाही पण ह्या मुलीने जगाला दाखून दिले की मुली पण कमी नाहि. कॉल आल्यावर जेवता ताटावरून निघून जाणारी ही निसर्ग प्रेमी श्रावणी  साप पकडायला जाते तेंव्हा साप विषारी आहे की बिन विषारी आहे याचा अजिबात विचार करत नाही.कोणताही विचार न करता ती सर्प पकडायला जाते.तर आत्ता पर्यंत तिने 69 सापाला त्यांच्या मूळ आदिवासात मुक्त केले आहे.त्यात काही विषारी सापे सुद्धा होती.तर काही बिन विषारी पण होती.महीलांसाठी खूप मोलाची गोष्ट आहे  की एक मुलगी अस काम करत आहे. पुरुष या क्षेत्रात कार्यरत आह

रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांना 'डि.लिट.' पदवी जाहीर; जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाकडून होणार गौरव

Image
रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांना 'डि.लिट.' पदवी जाहीर; जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाकडून होणार गौरव पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल रायगड भूषण आदरणीय डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांना जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापीठाच्यावतीने मानाची डि.लिट. पदवी जाहीर करण्यात आली असून रविवार दिनांक ५ मार्च २०२३ सकाळी ११ वाजता नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली आयोजित समारंभात 'डी.लिट' ही मानाची पदवी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.  रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांना या पुर्वी युरोपियन इंटरनॅशनल विद्यापीठ, फ्रान्सच्या डि. लिट. पदवीसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सामाजिक कार्यातील योगदाना बद्दल सचिनदादा धर्माधिकारी यांना जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाच्या वतीने डि.लिट. पदवी जाहीर करण्यात आली असून विद्यापिठाचे कुलपती डॉ. विनोद टीब्रेवाल यांचे पत्र विद्यापिठाच्या शैक्षणिक संचालक डॉ. वनश्री वालेचा यांनी डॉ. सचिन धर्माधिकारी यांना द