Posts

Showing posts from March 2, 2023

पनवेल परिसरात हजारो श्री सदस्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

नवेल परिसरात हजारो श्री सदस्यांनी राबवली स्वच्छता मोहीम  नवीन पनवेल : थोर निरुपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ. नाना साहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी निमित्त दिनांक १ मार्च रोजी पद्मभूषण स्वच्छ्ता दुत आप्पा साहेब धर्माधिकारी आणि सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र भर स्वचछता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने पनवेल शहरात देखील श्री सदस्यांनी उपजिल्हा रुग्णालय, उड्डाणपुल, तलाव क्षेत्र, शहरातील सर्व रस्ते स्वच्छ करण्यात आले आहेत. या मोहिमेत पनवेल, मार्केट परिसर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील साधारण 4 हजार 193 श्री सदस्यांनी स्वचछता मोहिमेत सहभाग घेतला होता.         1 मार्च  2023 रोजी ति. डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमीत्त  महास्वच्छता अभियान आयोजित  केलेले आहे .स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच शहर स्वच्छतेसाठी जनजागृती निर्माण करण्याकरिता डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नविन पनवेल शहर, रेल्वेस्थानक परिसरात बुधवार दि.1मार्च रोजी सकाळपासू

स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादेचा कालावधी वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष 

Image
  स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादेचा कालावधी वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष  पनवेल(प्रतिनिधी) राज्यात कोरोनाच्या काळात कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादेचा कालावधी वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले.          आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केलेल्या तारांकित प्रश्नात म्हंटले कि, राज्यात कोरोनाच्या काळात वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादितील सवलतींचा कालावधी वाढवून देण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी डिसेंबर २०२२ मध्ये वा त्यादरम्यान मा. मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या काळात शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती देण्यासंदर्भात जाहिराती प्रसिध्द न झाल्यामुळे अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेल्यामुळे स्पर्धा परिक्षेस बसण्याची त्यांची संधी हुकली असल्याचे निदर्शनास आले आहे, असे असल्यास या  प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तसेच कोरोनाच्

अंमली पदार्थांच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली

  अंमली पदार्थांच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खारघर सेक्टर १२ मधिल एका रो हाऊसवर छापा टाकून १ कोटी ७० लक्ष रूपयांचे गांजा, चरस, हेरॉईन व मेथाक्युलॉन हे अंमली पदार्थ दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी जप्त केले असून या प्रकरणी परदेशी नायजेरीयन नागरीकांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विक्री व्यवसायात परदेशी नायजेरीयन नागरीकांचा मोठया प्रमाणात सहभाग सातत्याने दिसून येत असून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी स्थानबध्दता केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परदेशी तसेच व्हिसा संपलेल्या नागरीकांना त्यांच्या मुळ देशात परत पाठविण्याबाबत तसेच अंमली पदार्थांच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दाखल करून या महत्वाच्या विषयावर शासनाचे लक्ष केंद्रित केले.          उपमुख्यमंत्री