संवर्धनाची ८० कासव पिल्ले हरिहरेश्वर-मारळ येथील समुद्रमध्ये सोडण्यात आले.
संवर्धनाची ८० कासव पिल्ले हरिहरेश्वर-मारळ येथील समुद्रमध्ये सोडण्यात आले.
श्रीवर्धन, राजू रिकामे (रायगड मत)
श्रीवर्धन मधील दक्षिणकाशी तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर पंचक्रोशीतील मारळ आगर येथील समुद्रकिनाऱ्यावरील कासव घरट्यातून बाहेर पडलेल्या ८० पिल्ले यांना समुद्रात सोडण्यात आले.
या पर्वातील रायगड जिल्हात सर्वप्रथम श्रीवर्धन तालुका ग्रामपंचायत मारळ हरिहरेश्वर आगर या समुद्रकिनारी कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दि.२९ ऑक्टोबर २०२३ रोजी रविवारी कासवाचे पहिले घरटे तयार झाले होते.
सह्याद्री निसर्ग कासव संवर्धन, श्रीवर्धन वनविभाग यांच्या अधिपत्याखाली कासव संवर्धन मारळ हरिहरेश्वर आगर.. हरिहरेश्वरला लाभलेला सुंदर समुद्र किनाऱ्यावरती ह्या हिवाळ्याच्या सुखद पर्वा मध्ये कासव हे समुद्रकिनाऱ्यावरती असलेल्या वाळूमध्ये आपली अंडी घालण्याकरिता येत असतात. यावर्षी दि. २९/१०/२०२३ रोजी या समुद्रकिनारी पहिले घरटे दाखल झाले. प्रजनन कालावधी करिता एकूण ६४ दिवसाचं कालखंड असावा लागतो परंतु सध्या झालेल्या हवामानाच्या बदलामुळे हवेमध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे ४७ दिवसांमध्ये १७ दिवस अगोदरच कासवांची पिल्ले दिनांक १४/१५/१६ डिसेंबर २०२३ या तीन दिवसांमध्ये एकूण ८० पिल्ले. सुखरूप समुद्राच्या दिशेने सोडण्यात आली.
या पद्धतीची माहिती मारळ हरिहरेश्वर आगारचे गेले अनेक वर्ष कासव संवर्धनाचे काम करत असलेले संवर्धन प्रेमी जयंत काका कानडे यांनी दिली. आणि यापुढे देखील कासव संवर्धनाचे कार्य चालू राहील असे आश्वासन कानडे यांनी दिलं आणि या पर्वातील सर्वात प्रथम घरटे आपल्या समुद्र ठिकाणी आल्याचा आनंद सर्व कासव प्रेमी मित्रमंडळींना होत होता.
"मी एक ब्राह्मण कुटुंबातील व्यक्ती, आपण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो या पवित्र हेतूने हे संवर्धन कार्य करून कासवांना जीवदान देण्याचं उत्तम कार्य करत आहे..... जयंत काका कानडे
Comments
Post a Comment