व्यायाम शाळेत लोखंडी रॉड व लोखंडी बेंच चोरी : म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
व्यायाम शाळेत लोखंडी रॉड व लोखंडी बेंच चोरी : म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
म्हसळा - राजीव नेवासेकर:
म्हसळा- बेलदार वाडी येथील व्यायाम शाळेत २ लोखंडी रॉड व १ लोखंडी बेंच चोरी झाल्याची तक्रार डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यायाम शाळेचे अध्यक्ष शाहिद उकये यांनी म्हसळा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि,मी शाहीद अब्दुल उकये म्हसळा बेलदार वाडी येथील डॉ. बाबासाहेब आबेडकर व्यायामशाळेचे अध्यक्ष म्हणुन गेले 2004 पासून काम करीत आहे. सदर व्यायामशाळेत म्हसळा, नवानगर, म्हसळा शहर, म्हसळा बायपास येथील मुले व्यायाम करण्याकरीता नेहमी येतजात होती. आमची व्यायामशाळा ऑगस्ट-2022 पासुन बंद असुन सदर व्यायामशाळेस आम्ही कुलुप लावुन ठेवलेले होते. सदर व्यायामशाळेत एक रनिंग मशीन, तीन चेस्ट मशिन, चार लोखंडी बेंचेस, 20 डबेल्स, 4 लोखंडी रॉड असे सामान होते.
दि. 02डिसेंबर 2023 रोजी रात्रीचे 03.15 वाजताचे सुमारास सागर चव्हाण याने फोनद्वारे कळविले कि, आज दिनांक-02/12/2023 रोजी रात्रीचे 03.00 वाजताचे सुमारास मी तसेच शरद चव्हाण, भरत चव्हाण, मुनीम हुर्जुक असे आम्ही व्यायामशाळेच्या समोरील रस्त्यावर बोलत उभे असतांना, तेथे म्हसळा येथे राहणारा सागर उमेश साळुंखे, भारत यशवंत पवार, दिपक दिलीप पाडावे हे जीममधुन लोखंडी रॉड व बेंचमशीन बोरी करून जात असतांना आम्हाला दिसल्याने आम्ही त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते तेथुन पळुन गेले आहेत, असे सांगीतल्याने मी म्हसळा बेलदारवाडी येथे जावुन पाहणी केली असता, आमचे व्यायामशाळेचा पाठीमागील दरवाज्याचे कुलुप तुटलेला होता व दरवाजा उघडा होता. म्हणुन मी तसेच माझे सोबत माझा मुलगा शहनवाज तसेच सागर चव्हाण, शरद चव्हाण, भरत चव्हाण, मुनिम हुर्जुक असे आम्ही व्यायामशाळेत जावुन पाहणी केली असता, मला व्यायामशाळेत 2 लोखंडी रोड, तसेच 1 लोखंडी बॅच सागर उमेश साळुंखे, भरत यशवंत पवार, दिपक दिलीप पाडांचे सर्व रा. म्हसळा ता. म्हसळा जि. रायगड यांनी चोरी करुन नेल्याचे दिसुन आलेले आहे. आमचे व्यायामशाळेतील चोरीस गेलेल्या सामानाचे वर्णन खालील प्रमाणे,1)200/-रूपये किंमतीचे 2 लोखंडी रॉड, त्याची लांबी साधारण 5 ते 6 फुट लांबीचे जु.वा.कि.अं. 2)5000/-रुपये किंमतीचा 1 लोखंडी बेंच जु.वा.कि. अं.5200/-रूपये किमतीचा.
तरी दिनांक 02/12/2023 रोजी रात्री 03.00 वाजता चे सुमारास सागर उमेश साळुंखे, भारत यशवंत पवार, दिपक दिलीप पाडावे सर्व रा. म्हसळा ता. म्हसळा जि. रायगड यांनी आमचे म्हसळा बेलदारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यायामशाळेचा पाठीमागील दरवाजाचा कुलूप तोडुन दरवाजावाटे प्रवेश करुन 2 लोखंडी रॉड, व 1 लोखंडी बॅचची चोरी केली म्हणुन माझी सागर उमेश साळुंखें, भारत यशवंत पवार, दिपक दिलीप पाडावे याचे विरुद्ध तक्रार आहे.असे शाहनवाज उकये यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment