जल जीवन मिशनचे हालच हाल, ठेकेदार - अधिकारी मात्र झाले मालामाल... - निलेश मांदाडकर जल जीवन मिशन योजनेला वाली कोण? म्हसळा (रायगड मत)


जल जीवन मिशनचे हालच हाल, ठेकेदार - अधिकारी मात्र झाले मालामाल...

- निलेश मांदाडकर 


जल जीवन मिशन योजनेला वाली कोण?

म्हसळा (रायगड मत)

 देशाचे सन्माननीय पंतप्रधाननरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून "आझादी का अमृत महोत्सव साजरा करीत असताना ग्रामीण भागातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यत पिण्याचे पाणी मिळण्यासाठी '"हर घर नळ हर घर जल "'ही संकल्पना प्रभाविपणे राबविण्याचे उद्दिष्ट मा. पंतप्रधान यांनी जाहीर केले.

   रायगड जिल्यातील अनेक तालुक्यामध्ये जल जीवन मिशन योजने मार्फत केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून या योजना राबविण्यात येत आहेत. या योजणांना भरघोष निधी प्राप्त झाल्या संबंधित ऑनलाईन ठेकेदारांच्या नावे काही ठिकाणी मर्जीचे सबठेकेदार तर काही ठिकाणी कर्मचारीच ठेकेदार बनले.

   ग्रामसभेला महत्व व जलजीवन मिशन योजना कमेटी ला कागदावरच ठेऊन संबंधित अधिकारी यांच्या मनमानी कारभाराने जल जीवन मिशन योजना किमान २५वर्षासाठी इस्टिमेंट मूल्यांकन झालेले असताना सुमार दर्जाचे काम चालू आहेत.

  अनेकवेळा कार्यालयात माहिती घेतली असताना उपाभियंता कनिष्ठ अभियंता ते हंगामी कंत्राटी अभियंता यांच्या मर्जीने मूल्यांकन करीत असल्याचे निदर्शनास येत आहेत. म्हणूनच जल जीवन मिशन योजना नक्की जनतेसाठी कि ठेकेदार अधिकारी यांच्या उपजीविके साठी असा सवाल श्री निलेश परशुराम मांदाडकर यांनी केला आहे.

    सदर जलजीवन मिशन योजना राबविताना ठेकेदार व सब ठेकेदार यांच्या मर्जीने मूल्यांकन होत आहे खोदाई काँक्रिट स्टील पाईप पाण्याचा उगम यांचा दर्जा न पाहता साईड व्हिजिट न करता सोईनुसार मूल्यांकन होत आहेत.

   सदर उपाभियंता यांच्या कडे माहिती घेतली असता सर्वच योजनेवर जाणे शक्य नाही लाईनआउट कामाचा दर्जा पाहणे शक्य नसल्याचे उपाभियंता श्री फुलपगारे यांनी स्पष्ट केले.

   म्हसळा तालुक्यातील सुरई खरसई वारळ खामगाव तोराडी इतर ठिकाणी जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहेत या योजनेचा कामाचा दर्जा पाहता उपाभियंता आणि ठेकेदार यांच्या सोईनुसार राबविताना दिसत आहेत राजकीय दबावापोटी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प असल्याचे निदर्शनास येत आहेत.

तरी संबधित जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी मुख्य अभियंता यांनी संबंधित योजनेकडे गंभीर्याने लक्ष घालणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. जर वेळीच लक्ष दिले नाही तर या जलजीवन मिशन योजने ला वाली कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर