रखडलेला माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला पण शेतकऱ्याचा मोबदला रखडला.* *शेतकऱ्यांनी दिला आमरण उपोषण चा इशारा.*




रखडलेला माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला पण शेतकऱ्याचा मोबदला रखडला.*

 शेतकऱ्यांनी दिला आमरण उपोषण चा इशारा.* 


श्रीवर्धन : 

अनेक वर्ष पासून माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले होते ते रस्त्याचे काम पूर्ण झाले परंतु ज्या शेतकऱ्यांची जागा राष्ट्रीय महामार्ग मधे गेली ते आजही आपले भरपाईची वाट पाहत आहेत. असाच एक प्रकार म्हसळा येथे ज्येष्ठ नागरिक शरीफ हळदे यांचे सोबत घडला आहे. गरीब शेतकरी ची जागा मौजे सकलप स.नं १९/१ ही भूसंपादन करण्यात आली होती. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता व जागा मालकाला कोणताही मोबदला न देता माणगाव ते दिघे राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. आज ही ते मोबदलाची वाट पाहत आहेत. वेळो वेळी अर्जाला केराची टोपली दाखवली गेली अखेर त्यांनी आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे. दिनांक ०५ डिसेंबर रोजी उपविभागीय कार्यालय येथे जाऊन उपविभागीय अधिकारी श्रीम. दीपा भोसले यांना लेखी अर्ज देऊन १५ दिवसात जर मोबदला मिळाला नाही तर मी उपविभागीय कार्यालय श्रीवर्धन यांच्यासमोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा दिला आहे आणि या अर्जाची परत राज्याचे मुख्यमंत्री मा श्री एकनाथ शिंदे, मा.श्री नितीनी गडकरी, मा. ना कु.अदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्रराज्य, मा. कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य, मा. जिल्हाधिकारी रायगड, मा. पोलीस अधीक्षक रायगड, मा. तहसीलदार म्हसळा यांच्या माहिती साठी व पुढील कारवाई साठी पाठवण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर