पिल्लई रसायनी कॅम्पसतर्फे "एनव्हिजन" जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविधांगी स्पर्धांचा समावेश






 पिल्लई रसायनी कॅम्पसतर्फे "एनव्हिजन"

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविधांगी स्पर्धांचा समावेश 


श्वेता भोईर 


महात्मा एजुकेशन सोसायटीच्या पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पस तर्फे रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी "एनव्हिजन २०२३" या कार्यक्रमाचे आयोजन नुकताच करण्यात आले होते. या मध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व तांत्रिक अशा विविध प्रकारच्या एकूण ३२ स्पर्धांचा समावेश होता. यावेळी रायगड जिल्ह्यातील जवळपास ५० हुन अधिक शाळांनी तर हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मोठ्या उत्साहात या स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी खालापूर विभाग पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, गटशिक्षण अधिकारी कैलास चोरमाळे, केंद्रप्रमुख किशोर परदेशी, महात्मा एजुकेशन सोसायटीच्या पब्लिक रिलेशन्स व कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स डिरेक्टर डॉ. निवेदिता श्रेयांस यांची मुख्य उपस्थिती लाभली. 


पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पस तर्फे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच "कम्युनिटी आउटरीच इनिशिएटिव्ह प्रोग्रॅम" अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच अनुषंगाने "एनव्हिजन" या बहुआयामी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रश्नमंजुषा, हस्ताक्षर, निबंध लेखन, शुद्धलेखन, गणित ऑलिम्पियाड, विज्ञान परिषद, वक्तृत्व,व्यवसाय योजना, नृत्य, गायन, फॅशन शो, चित्रकला, रांगोळी, एकपात्री अभिनय, हस्तकला,छायाचित्रण, मेहेंदी, पाककला, कविता लेखन, बास्केटबॉल, बॉक्स क्रिकेट,फुटबॉल, व्हॉलीबॉल, लांब उडी, १००मी शर्यत, ४*१०० मी रिले,बुद्धिबळ, कॅरम,सीएस-गो, लघुपट, मिम बनविणे, ड्रोन वर्कशॉप, एथिकल हॅकिंग, सॉलिड वर्क, लेजर कटर व थ्री डी, प्रिंटर वर्कशॉप या स्पर्धांचा समावेश होता. 


या कार्यक्रमास पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पस डेप्युटी सीईओ व एसीएस कॉलेज प्रिन्सिपल डॉ. लता मेनन, इंजीनिअरिंग कॉलेज प्रिन्सिपल डॉ. जे डब्लू बाकल, आर्किटेक्चर कॉलेज प्रिन्सिपल सुचिता सयाजी, डिप्लोमा सेक्शन प्रमुख अमर मांगे, एजुकेशन व रिसर्च कॉलेज प्रिन्सिपल ममता पाटील, पिल्लई एचओसीएल इंटरनॅशनल स्कुल प्रिन्सिपल रिमा निकाळजे, वाइस प्रिन्सिपल पाटील सर मार्केटिंग हेड गणेश शिंदे, ऍडमिनिस्ट्रेटर दिलीप महाडिक यांची उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम मोठ्या उत्साहात परंतु शांततेत संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर