८० वर्षाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी डॉ. विक्रम कामत ह्यांनी सुरु केले 'कामत्स लेगसी’ मुंबईकरांसाठी साऊथ इंडियन पदार्थांचा एक अविस्मरणीय जेवणाचा अनुभव - डॉ. विक्रम कामत
८० वर्षाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी डॉ. विक्रम कामत ह्यांनी सुरु केले 'कामत्स लेगसी’
मुंबईकरांसाठी साऊथ इंडियन पदार्थांचा एक अविस्मरणीय जेवणाचा अनुभव - डॉ. विक्रम कामत
कामत म्हंटल की डोळ्यासमोर लगेच प्रख्यात मराठी हॉटेलिअर डॉ. विठ्ठल कामत आणि त्यांनी सुरु केलेल्या हॉटेल्स, व रेस्टोरंट समोर येतात. हायवे वरून प्रवास करताना सगळ्यात जास्त खात्रीच रेस्टोरंट असेल तर ते म्हणजे कामत रेस्टोरंटच आहे, गेल्या ८० वर्षापासून कामत ह्या उद्योगात सर्वश्रेष्ठ आहे. सर्वात विश्वासार्ह रेस्टॉरंट अशी ओळख झाल्यानंतर हा वारसा अजून पुढे नेण्यासाठी आता डॉ. विक्रम कामत ह्यांनी 'कामत्स लेगसी' ह्या प्रिमिअम डायनिंग रेस्टॉरंट चेनची सुरुवात शहरात सुरु केली आहे.
चांगलं, स्वछय आणि चविष्ट म्हणून नेहमी च कामतची ओळख आहे, तीच ओळख अजून पुढे चालवी व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांना चविष्ट साऊथ इंडियन पदार्थांचा आस्वाद घेता यावा हेच 'कामत्स लेगसी' मागचे मुख्य उद्देश आहे. डॉ. विक्रम कामत म्हणतात की "प्रत्येकाच्या आयुष्यात अन्नाद्वारे आनंद आणणे हा आमचा प्रयन्त आहे, आणि मला विश्वास आहे की 'कामत्स लेगसी' मुंबईकरांसाठी साऊथ इंडियन पदार्थांचा एक अविस्मरणीय जेवणाचा अनुभव ठरेल. आम्ही हा ८० वर्षाचा वारसा असाच अजून पुढे घेऊन जाऊ ह्यावर मला विश्वास आहे"
'कामत्स लेगसी’ पहिले रेस्टोरंट भांडुप मध्ये २०२२ साली सुरु केले होते, तिथे मिळण्यारा प्रतिसादाला लक्ष्यत घेता ह्याचे दुसरे रेस्टोरंट मुंबईच्या नरिमन पॉईंट मध्ये सुरु झाले आहे.
Comments
Post a Comment