दमदार कामगार नेते संतोष भाई घरत यांनी ॲाल कारगो लॅाजिस्टाक प्रा. लि. या कंपनीतील कर्मचाऱ्यांना मिळवून दिली भरघोस पगार वाढ़ # कामगार वर्गामध्ये एकच जल्लोष # कामगार नेते संतोष घरत यांनी उरण वासियांचा जिंकला विश्वास
दमदार कामगार नेते संतोष भाई घरत यांनी ॲाल कारगो लॅाजिस्टाक प्रा. लि. या कंपनीतील कर्मचाऱ्यांना मिळवून दिली भरघोस पगार वाढ़
कामगार वर्गामध्ये एकच जल्लोष
कामगार नेते संतोष घरत यांनी उरण वासियांचा जिंकला विश्वास
प्रतिनिधी (उरण)
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत व रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कामगार संघटनेचे राष्ट्रीय महासचिव एन. बी. कुरणे या सर्वांच्या प्रयत्नामुळे RMBKS कार्यालय जासई उरण येथे वेतन वाढ.
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ च्या वतीने मे. ॲाल कारगो लॅाजिस्टाक प्रा. लि. (ट्रान्सइंडीया) खोपटे, उरण या कंपनी अंतर्गत मे. पायोनियर कारगो प्रा लि. लोकल लेबर कामगारांचा रू 7100/- वेतनवाढीचा करार संपन्न. ग्रॅास पगार रू 28,900/-
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत व रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कामगार संघटनेचे राष्ट्रीय महासचिव एन. बी. कुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 18/12/2023 रोजी RMBKS कार्यालय जासई उरण येथे वेतन वाढ करार संपन्न झाला.
सदर करार करण्याकरीता (ट्रान्सइंडीया) युनिट अध्यक्ष रामेश्वर पाटील, कार्याध्यक्ष धर्मेंद्र पाटील, उपाध्यक्ष विशाल पाटील, महासचिव मनोज पाटील, सचिव स्वप्निल पाटील, कोषाध्यक्ष प्रमोद पाटील, सह पदाधिकारी सचिन पाटील, दिनेश पाटील व इतर सर्व कामगारांची एकजूट लाभली.
व्यवस्थापन मे. पायोनियर कारगो प्रा लि. चे डायरेक्टर जमशेद अश्रफ, मॅनेजर विशाल पाटील व ॲाल कारगो लॅाजिस्टाक चे IR मॅनेजर आंबादास यादव यांचे विशेष आभार.
सदर करारामध्ये रू. 7100/- ची भरघोस वाढ, पहिल्या वर्षि 6300/- व दुसऱ्या 400/-, तिसऱ्या वर्षि 400/- अशी वाढ. बेसीकमध्ये 50% रक्कम व इतर भत्त्यांमध्ये 50% आणि काळावधी 3 वर्षाकरीता करण्यात आला. विशेष म्हणणे कामगार बदली भरती सुविधा कायम ठेवण्यात आली तथा कामगार बदली भरती संदर्भात नविन कामगाराला जुन्या कामगारांइतके वेतन देण्यात येईल. आगाऊ कर्ज, ट्युज कोटा पुर्ण झाल्यावर एक्ट्रा ट्युज वर ओटी, लिव्ह इनकॅशमेंट तसेच सरकारी नियमा नुसार सर्व फायदे व ईतर सुविधा.
राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) ने घेतलेल्या भुमिका व त्यांच्या नेतृत्वामुले कामगार वर्ग आनंद साजरा करीत आहे आणि संघनेच्या पदाधिकाऱ्यांवर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment