आंतरराष्ट्रीय पदक विजेता"कुणाल सुभाष पिंगळे" यांचा गौरव
आंतरराष्ट्रीय पदक विजेता"कुणाल सुभाष पिंगळे"
यांचा गौरव
अरुण पाटकर (नवीन पनवेल) :
नुकतीच दिनांक 11 ते 18 डिसेंबर 2023 या कालावधीत मलेशिया येथे पार पडलेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रायगडचे ज्युनिअर खेळाडू" कुणाल सुभाष पिंगळे"यांनी 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले होते. त्याबद्दल "पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड"चे वतीनेदिनांक 24 /12 /2023 रोजी घोडवली येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्याचे अभिनंदन करण्यात आले . त्याप्रसंगी संघटनेचे वतीने सचिव अरुण पाटकर, कार्याध्यक्ष यशवंत मोकल कार्यकारिणी सदस्य सुभाष टेंबे संदीप पाटकर आणि कुणाल पिंगळे याचे वडील सुभाष परशुराम पिंगळे, आई राजश्री पिंगळे, काका एकनाथ पिंगळे ,काकी पुष्पा एकनाथ पिंगळे आणि आजी सीताबाई परशुराम पिंगळे हजर होत्या. कुणाल पिंगळे ने मिळविलेल्या यशाबाबत संघटनेने अभिनंदन करून भेटवस्तू दिले तसेच अरुण पाटकर यांनी सुद्धा वैयक्तिक भेट वस्तू देऊन कुणाल पिंगळे याला पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या. कार्याध्यक्ष यशवंत मोकल यांनी कुणाल याने पॉवर लिफ्टिंग खेळापासून दुर न राहण्याची सूचना केली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच संघटनेचे पदाधिकारी यांनी घरी येऊन आपल्या मुलाचा सत्कार केला याबद्दल कुणाल चे "वडील सुभाष परशुराम पिंगळे" आई
"राजश्री सुभाष पिंगळे" यांनी समाधान व्यक्त केले. नातवाचे कामगिरीमुळे आजी सीताबाई परशुराम पिंगळे यांना समाधान लाभले असे त्यांच्या चेहऱ्यावर दिसले. कुणालचे काका "एकनाथ परशुराम पिंगळे"आणि काकी "पुष्पा एकनाथ पिंगळे" यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.
Comments
Post a Comment