कदाचित मी शुद्र असल्यामुळे त्या मला लक्ष्य करत असाव्यात, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नागपूर येथील पत्रकार परिषदेत म्हणाले.... # एखादा व्यक्ती’ असा माझ्याबाबत उल्लेख करणे भूषणावह नाही. त्यांचा काय राग आहे मला माहीत नाही. दिल्लीत सुनावणी असताना संताप अनावर झाला. कोणी काय चाट केले, मला माहीत आहे, माझी नियत साफ आहे. # वातावरण चिघळणार - मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे आमचेही मत आहे. # आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढणार असून ४५ पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
# कदाचित मी शुद्र असल्यामुळे त्या मला लक्ष्य करत असाव्यात, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नागपूर येथील पत्रकार परिषदेत म्हणाले....
# एखादा व्यक्ती’ असा माझ्याबाबत उल्लेख करणे भूषणावह नाही. त्यांचा काय राग आहे मला माहीत नाही. दिल्लीत सुनावणी असताना संताप अनावर झाला. कोणी काय चाट केले, मला माहीत आहे, माझी नियत साफ आहे.
# वातावरण चिघळणार - मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे आमचेही मत आहे.
# आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढणार असून ४५ पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रायगड मत / नागपूर
रायगड चे खासदार आणि अजित पवार यांचे राईट हॅन्ड सुनील तटकरे रविवारी नागपूरमध्ये होते. पक्षाच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सुप्रिया सुळे माझ्यावर गेल्या काही दिवसांत सॉफ्ट टार्गेट म्हणून टीका करत आहेत. ‘एखादा व्यक्ती’ असा माझ्याबाबत उल्लेख करणे भूषणावह नाही. त्यांचा काय राग आहे मला माहीत नाही. दिल्लीत सुनावणी असताना संताप अनावर झाला. कोणी काय चाट केले, मला माहीत आहे, माझी नियत साफ आहे.
सुप्रिया सुळे माझा महासंसद रत्न असा उल्लेख का करतात मला माहीत नाही. मी ज्या समाजातून आलो किंवा कदाचित मी शुद्र असल्यामुळे त्या मला लक्ष्य करत असाव्यात, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नागपूर येथे पत्रकार परिषदेत म्हणाले.
अनेक वर्षं त्यांच्यासोबत काम केले. मात्र मी शुद्र असल्याने कदाचित त्या माझा राग करत असतील. मात्र आता त्यांच्या वक्तव्याला प्रतिसाद देत नाही, असेही तटकरे म्हणाले.
सरकारच्या विनंतीनंतर जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतले. मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत असून मराठा समाजाला महायुती सरकार आरक्षण देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढणार असून ४५ पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. करोनाच्या काळात उद्धव ठाकरे घरी बसले असताना अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते. त्यानंतर मतभेद होऊन सत्तांतर झाले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि आम्ही ती वेळोवेळी मांडली आहे.
Comments
Post a Comment