भाजपने शेकापआघाडीला चारली पराभवाची धूळ विचुंबे ग्रामपंचायतीत शेकापचा दारुण पराभव; न्हावे ग्रामपंचायतही भाजप युतीकडे शेकापच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती भाजपकडे
भाजपने शेकापआघाडीला चारली पराभवाची धूळ
विचुंबे ग्रामपंचायतीत शेकापचा दारुण पराभव; न्हावे ग्रामपंचायतही भाजप युतीकडे
शेकापच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती भाजपकडे
पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने जोरदार मुसंडी मारली. विशेष म्हणजे विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीतही भाजप महायुतीने बाजी मारली.
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करीत बाजी मारली आहे. विशेषत्वाने अनेक वर्षांपासून शेकापक्षाच्या ताब्यातील विचुंबे ग्रामपंचायतमध्ये भाजपने शेकापच्या चारीमुंड्याचीत करत सत्ता मिळवली. तालुक्यातील आणखी एक महत्वाची असलेल्या न्हावे ग्रामपंचायतीचा गड लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अबाधित राहिला. या ठिकाणीही शेकाप युतीचा दारुण पराभव झाला. देवद व मालडुंगे ग्रामपंचायतीमध्येही भाजप युतीने आपले वर्चस्व कायम ठेवत सत्ता मिळवली. भिंगार, ओवळे, सोमाटणे ग्रामपंचायतीतही भाजप युतीचा करिष्मा पाहायला मिळाला. शेकाप आघाडीची सत्ता उलथवून भाजपने या ठिकाणी शेकापला पराभवाची धूळ चारली. एकूणच भाजप युतीने सरस कामगिरी करत शेकाप महाविकास आघाडीचे मनसुबे उधळून लावले.
पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक रविवारी पार पडली. या ग्रामपंचायतीचा निकाल आज (सोमवारी) पनवेल तहसिलदार कार्यालयात जाहीर झाला. न्हावे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी विजेंद्र गणेश पाटील, सदस्य म्हणून शैलेश विठ्ठल पाटील, रंजना चंद्रकांत पाटील, सुनिता तुषार भोईर, जागृती नितीन म्हात्रे, सागर कान्हा ठाकूर, नरेश सावळाराम मोकल, ललिता बाळकृष्ण ठाकूर, विचुंबे सरपंचपदी प्रमोद शांताराम भिंगारकर, सदस्य म्हणून अनिल विष्णू भोईर, श्रावणी विवेक भोईर, प्रगती आनंद गोंधळी, आरती अविनाश गायकवाड, विभुती चेतन सुरते, अनंता कमल्या गायकवाड, देवद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विनोद वामन वाघमारे, सदस्य म्हणून चंद्रा राम वाघमारे, कुंदा पांडुरंग वाघमारे, विजय नाना वाघमारे, साधना वाघमारे, दिनेश रामभाऊ वाघमारे, संदीप गणा वाघमारे, संदीप गणपत वाघमारे, करुणा वासुदेव वाघमारे, भिंगार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गुलाब रामदास वाघमारे, सदस्य म्हणून अशोक राजाराम गायकर, शामल महेश लहाने, सुनील नारायण पाटील, उज्वला अंबाजी वाघमारे, रीना राजेश पाटील, सुभाष जेठु पाटील, करीना संदेश पाटील, आशा नितीन वाघमारे, मालडुंगे सरपंचपदी सिताराम जानू चौधरी, सदस्य म्हणून विष्णू बुध्या पारधी, ताई चंदर भस्मा, वनिता राजू वाघ, माई प्रकाश खंडवी, अर्जुन मल्या कांबडी, जनार्दन नाग्या निरगुडा, उषा गणपत वारगडा, सोमाटणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तेजस्विनी आत्माराम पाटील, सदस्य म्हणून दीपा दीपक पाटील, विशाल रविंद्र पाटील, सुवर्णा रविंद्र कांबळे, अविनाश बामा मुंढे, आंबो पांडुरंग मुंढे, रजनी रामा मुंढे, ओवळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपेश सुरेश गायकवाड, तसेच गुळसुंदे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सतिश सदाशिव साठे, अपर्णा वसंत चौलकर, आशा गजानन वीर, जितेंद्र बाळकृष्ण पाटील, रमेश शांताराम मालुसरे, रचना रुपेश चव्हाण यांनी विजय मिळवला.
यावेळी विजयी उमेदवारांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, जिल्हा चिटणीस रत्नप्रभा घरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, अनेश ढवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment