शेकापच्या पुरुषोत्तम भोईरवर आर्थिक फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल




शेकापच्या पुरुषोत्तम भोईरवर आर्थिक फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


पनवेल (प्रतिनिधी) विचुंबे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सरपंच पदाचे उमेदवार पुरुषोत्तम भोईर याने जमिनींच्या व्यवहारात आर्थिक फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे त्याच्यावर शुक्रवारी रात्री खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुक संदर्भात कलम ४२० आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही पुरुषोत्तम भोईर वर जमिनीच्या व्यवहारातून गुन्हे दाखल असून व्यवहारातून लोकांची फसवणूक करण्याचा नित्यपाठ असलेल्या पुरुषोत्तम भोईर याने आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. 


           सुदाम इंगळे यांनी दिनेश शंभुराम उर्फ शंभुलाल मांगे यांच्याकडून पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द येथील बिनशेती जमीन खरेदी केली होती. व त्यानुसार झालेल्या व्यवहाराप्रमाणे ७१ लाख रुपयांपैकी २५ लाख रुपये रोख व बँक ट्रान्सफरद्वारे अदा करण्यात आली तर उर्वरित रक्कम भूखंडाची सरकारी मोजणी केल्यानंतर व हद्दी निश्चित झाल्यानंतर नोंदणीकृत खरेदीकृत खरेदीखताचा दस्त करताना देण्याचे उभयपक्षीयांत ठरले होते. परंतु सदर क्षेत्रफळाचा वाद प्रलंबित असताना दिनेश मांगे यांनी वकिलामार्फत करार रद्द करण्याचा तर सुदाम इंगळे यांनी कराराची विशेष पुर्तता करून मिळण्यासाठी व निरंतर ताकीद हुकूम मिळण्याकरिता पनवेल येथील दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर न्यायालयात दावा दाखल केला होता. दरम्यान न्यायालयात दावा प्रलंबित असतानाही पुरुषोत्तम भोईर याने सदरचा भूखंड सेल डिड द्वारे विक्री केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कळताच सुदाम इंगळे यांनी दिनेश मांगे व पुरुषोत्तम भोईर यांच्या विरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पुरुषोत्तम भोईर याने सदरच्या भूखंडाचा वाद मिटवण्यासाठी वकिलामार्फत विचारणा केली असता, सुदाम इंगळे हे कराराची उर्वरित रक्कम आणि दिनेश मांगे यांनी सुदाम इंगळे यांच्याकडून स्विकारलेली रक्कमही पुरुषोत्तम भोईर याला देतील व त्यानुसार पुरुषोत्तम भोईर सदरचा भूखंड सुदाम इंगळे व सुनिल सुदाम इंगळे यांच्या लाभात करून देतील व त्यास दिनेश मांगे संमती देतील अशा स्वरूपाची लेखी तडजोड न्यायालय समक्ष झाली व त्याप्रमाणे सदरचा दावा निकाली काढण्यात आला. त्यानुसार मांगे व इंगळे यांच्याकडून पुरुषोत्तम भोईर यास ७१ लाख रुपये अदा करण्यात आले. अधिकची रक्कम मिळाली असतानाही बेकायदेशीरपणे पुरुषोत्तम भोईर सदरच्या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. न्यायालयासमक्ष दावा संपुष्टात आल्यानंतरही पुरुषोत्तम भोईरची नियत फिरली. खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करत असल्याने इंगळे यांनी सदर भूखंडासंदर्भात माहिती घेतली असता पुरुषोत्तम भोईर याने सदरचा भूखंड जनार्दन पाटील यांना परस्पर साठेखतान्वये विक्री केल्याचे उघड झाले. त्यामुळे ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी या संदर्भात विचारणा करण्यासाठी सुनिल इंगळे विचुंबे येथे आले असता पुरुषोत्तम भोईर श्री. ज्ञानेश्वर माऊली सहकारी सोसायटी या ठिकाणी निवडणुकीचा प्रचार करत होता. त्यावेळी माझा भूखंड खरेदीखत करून देण्याबाबत आपण कोर्टात तडजोड केली असताना हा भूखंड परस्पर विक्री का केला अशी विचारणा सुनिल इंगळे यांनी केली असता, पुरुषोत्तम भोईर याने 'आता त्या भूखंडाची किंमत पाच कोटी रुपये झाली आहे तरी हा भूखंड मी तुला मिळू देणारच नाही' असे सांगून जातीवाचक शिवीगाळ करत जातीचा अपमान करून तेथून सुनिल इंगळे यांना हाकलून दिले. त्यामुळे न्यायालयाची आणि आपली फसवणूक आणि जातीचा अपमान झाल्यामुळे सुनिल इंगळे यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात पुरुषोत्तम भोईर याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ४२०, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ नुसार कलम ३ (१)(आर), कलम ३ (१)(एस), कलम ३ (१)(यू), कलम ३ (२), कलम ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर