रायगड मध्ये महिला बचत गटाने बनवलेला दिवाळी फराळाचे प्रदर्शन व विक्री. महिला बचत गटांच्या वस्तूंना ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देणार ------- मंत्री आदिती तटकरे. .श्रीवर्धन
रायगड मध्ये महिला बचत गटाने बनवलेला दिवाळी फराळाचे प्रदर्शन व विक्री.
महिला बचत गटांच्या वस्तूंना ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देणार
------- मंत्री आदिती तटकरे. .श्रीवर्धन -
प्रतिनिधी / राजू रिकामे:
रायगड जिल्हातील इंदापूर, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन तालुका तसेच बोर्ली येथे मा.ना.कु. अदिती तटकरे महिला व बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी, वेगवेगळ्या बचत गटाने दिवाळी निमित्त बनवलेल्या फराळ स्टॉलचे उदघाटन केले. .रायगड जिल्ह्यातील शहरातील व ग्रामीण भागातील छोटे मोठे बचत गटांनी दिवाळी सणा निमित्त दिवाळी फराळाचा, आकर्षक वस्तू, रांगोळी, कंदील व उत्पादित केलेल्या मालाच्या प्रदर्शन व विक्री साठीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. श्रीवर्धन महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची गुणवत्ता दर्जेदार असल्याचे कौतुक अदिती तटकरे यांनी केले. दिवाळीच्या शुभ आगमनाने महिला तसेच बचत गटाच्या माध्यमातून सर्व महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात विकास कसा होईल, त्याच बरोबर बचत गट संख्या वाढविली जाईल या वर जास्त प्रयत्न मा. आदिती तटकरे करत आहेत. दिवाळी साठी हे तात्पुरत्या स्वरूपाचे विक्री केंद्र उपलब्ध करून दिलेले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने आपल्याला फराळाचे चाविष्ठ घरगुती पदार्थ लाडू, चिवडा, चकली,अनारसे तसेच मसाले व अनेक इतर खाद्य वस्तू उत्तम प्रकारे बचत गट व महिला बनवीत असताना उत्पादन बनविण्याचा खर्च कसा कमी होईल आणि विक्री किंमत कशी जास्त मिळून फायदा होईल, याकडे महिला ने लक्ष्य देणे गरजेचे आहे. शासनाने सी.आर.पी. चा निधी तीन हजार रुपये होता आता सहा हजारांवर केलेला आहे. मोदक बनविताना वेगवेगळे फ्लेवर बनवायचे वेगवेगळ्या सणाला जेणेकरून पर्यटक नविन काही खरेदी करताना आवड होईल, सुकलेल्या मच्छी पासून पापड बनविले जातात त्याला मोठ्या प्रमाणत मार्केटमध्ये हाँटेलमध्ये मागणी आहे. बचत गट संख्या वाढत गेली पाहिजे महिलांना योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा त्यांच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपण नेहमी सोबत आहोत, महिलांना प्रशिक्षण केंद्र व उत्पादन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे मार्गदर्शन करताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. तसेच आपल्या मालाची ऑनलाईन विक्री करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. प्रदर्शनातील सर्व स्टॉल्स वर भेट देऊन सर्व महिलांना सदिच्छा दिल्या. या वेळी सर्व ठिकाणी खुप मोठ्या प्रमाणात बचत गट, महिलाची उपस्थिती होती. .श्रीवर्धन व बोर्ली येथे या कार्यक्रमाला विशेष कार्यकारी अधिकारी शीतल फुंड, प्रकल्प संचालक (DRDA) प्रियदर्शनी मोरे, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, गट समन्वयक किशोर गोरटे, ग्रामसेवक अभिजीत माने, श्याम भोकरे, दर्शन विचारे, नंदकुमार पाटील, सबा फिरफीरे, राजसी मुरकर, प्रविता माने, ऋतीका हावरे, तसेच बचत गटातील महिला, राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होत्या.
Comments
Post a Comment