श्रीवर्धन मध्ये आठ पैकी सश्रीवर्धन मध्ये आठ पैकी सहा ग्रामपंचायती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे
श्रीवर्धन मध्ये आठ पैकी सश्रीवर्धन मध्ये आठ पैकी सहा ग्रामपंचायती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे
श्रीवर्धन प्रतिनिधी (रायगड मत)
राजू रिकामे. श्रीवर्धन तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मतमोजणी प्रक्रियेनंतर चार थेट सरपंचसह एक उपसरपंच तसेच इतर सदस्य निवडीवर दि. ०६ रोजी सोमवारी शिक्कामोर्तब झाला निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकानी गुलाबाची उधळण करून फटक्यांची अतीषबाजी करून विजय जल्लोष साजरा केला. . श्रीवर्धन तालुक्यात एकूण आठ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. एकूण आठ पैकी तीन ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या होत्या म्हणून उर्वरित पाच ग्रामपंचायतीमध्ये प्रत्यक्षात निवडून झाली. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायत पैकी गाणी सरपंच पदी राष्ट्रवादीचे आदित्य कासरुंग, दांडगुरु सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहा महाडिक, बागमांडला उपसरपंच पदी शिवसेना शिंदे गट प्रतोष कोलथरकर, हरवित सरपंचपदी राष्ट्रावादीचे इम्तियाज परकार, भरडखोल सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्योती काळपाटील, वावे तर्फे श्रीवर्धन सरपंचपदी इंडिया आघाडीचे मनोहर सावंत, खारगाव ग्रामपंचायतचे राष्ट्रवादीचे अमोल पुसाळकर आणि वाकळघर उपसरपंच पदी राष्ट्रवादी बिनविरोध उमेदवार असणार आहे. तालुक्यात एकूण आठ पैकी सहा ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस कडे व एक ग्रामपंचायत शिंदे गटाने श्रीवर्धन आपला खाता उघडला आहे, तर उर्वरित एक ग्रामपंचायत ही इंडिया आघाडीला मिळाली आहे.
Comments
Post a Comment