कोळवट ग्रामपंचायतीवर महिला राज राष्ट्रवादीच्या सुवर्णा येलवे सरपंच तर प्रविणा ठोंबरे उपसरपंच निवड .

कोळवट ग्रामपंचायतीवर महिला राज

राष्ट्रवादीच्या सुवर्णा येलवे सरपंच तर प्रविणा ठोंबरे उपसरपंच निवड .


म्हसळा - रायगड जिल्ह्यातीत नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत मध्ये म्हसळा तालुक्यातील गृप ग्रामपंचायत कोळवट हि ग्रामपंचायत अगदी प्रतिष्ठेची निवडणूक झाली. गेली अनेक वर्षे हि ग्रामपंचायत  शिवसेना पक्षाकडे होती. पाच वर्षांपूर्वी या ग्रामपंचायत मध्ये निवडणूक अटीतटीची झाली होती पण 45 मतांनी पराभव राष्ट्रवादी ला स्विकारावा लागला. पण आता झालेल्या निवडणुकीत प्रचंड मतांनी लिड घेत सरपंच पदाच्या उमेदवार सौ सुवर्णा सुनील येलवे कोळवट राष्ट्रवादी कडून भरघोस मतांनी विजयी आल्या , उपसरपंच पदासाठी प्रविणा प्रविण ठोंबरे यांची बिनविरोध निवड झाली. या भागातील मतदार स्वतः बांधवांनी  पुढाकार घेऊन हा अनेक वर्षाचा बदल घडवून आणला. गेली अनेक वर्षे या ग्रामपंचायतीच्या कारभाराला  या भागातील अक्षरशः मतदार कंटाळले होते .शेवटी मतदारांनी मतदान पेटीच्या माध्यमातून आपली इच्छा दाखवून दिली.

       या ग्रामपंचायत मध्ये सरपंचसह पाच सदस्य राष्ट्रवादी पक्षाकडे आहेत. रायगड जिल्ह्याचे खासदार मा श्री सुनिलजी तटकरे, महिला व बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे, विधानपरिषद आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या नेतृत्वावर व विकास कामांवर विश्वास ठेवून या पंचक्रोशीत मोठा फेरबदल झालेला आहे.

  सरपंच सुवर्णा येलवे यांनी प्रसिद्धी माध्यमांजवळ संपर्क साधला असता. यांनी सांगितले की, या भागातील महत्त्वपूर्ण कामे. माझ्या पंचक्रोशीत रस्ता  - चिरगाव - भापट - कोळवट  हा रस्ता रहदारी चा असून हा चांगल्या प्रकारे काम झाले पाहिजे आणि ताम्हणे करंबे वाडी ( घाणेरी कोंड) चा रस्ता आपला गेली अनेक वर्षे रखडलेला आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून तो रस्ता डांबरीकरण गावापर्यंत झालेला नाही हे फार मोठे दुर्दैव ,  तसेच कोळवट ते पाणदरेला जोड रस्ता मिळाला पाहिजे यासाठी पहिले योगदान देऊन अशी पुढील कामांची मा. श्रीमती अदिती ताई तटकरे यांच्या कडे प्रत्यक्ष विचारविनिमय करून या भागातील गेली अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिन. आमच्या पंचक्रोशीतील विधवा महिलांसाठी, निराधार कुटुंब पेन्शन योजना बाबत. माहिती वाडी वस्तीवर पोहचत नाही यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत, दिव्यंग साठी बरेच लाभार्थी आमच्या भागात वंचित आहेत. त्यांच्या साठी सुद्धा विशेष लक्ष देऊन जनतेची सेवा जास्तीत जास्त कशाप्रकारे होईल याकडे लक्ष केंद्रित करू.

माझ्या गृप ग्रामपंचायत मध्ये पाच गावे येत असून प्रत्येक गावातील विकासात्मक बाजूने विचार करून ग्रामपंचायत पुढे नेण्यासाठी कटीबध्द राहू .

कोळवट ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी कडून सौ सुवर्णा सुनील येलवे,  उपसरपंच प्रविणा प्रविण ठोंबरे, सदस्या सौ. सुप्रिया संतोष घडशी, विकिता विनोद वणे, सदस्य श्री लक्ष्मण गोविंद मोहिते, श्री बळीराम पांडुरंग लाड निवडून आले.

या साठी म्हसळा तालुका राष्ट्रवादी पक्ष अध्यक्ष समिर बनकर, माजी कृषी सभापती बबन मनवे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक सुनील शेडगे , माजी उपसभापती मधुकर गायकर, काशिमशेठ मेमन तसेच पंचक्रोशीतील आजी माजी कार्यकार्ते यांनी अथक परिश्रम घेतले. या भागातील तरूण वर्ग प्रत्यक्षात निवडणुकीत सहभागी होऊन हा बदलता पर्व पहायला मिळाले.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर