भाजप महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा -आमदार प्रशांत ठाकूर





भाजप महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा -आमदार प्रशांत ठाकूर


पनवेल (प्रतिनिधी) देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची होत असून विचुंबे ग्रामपंचायतीमधील विकासाची गाडी आणखी वेगाने धावण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ०५ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास या सूत्राला मतदान करून भाजप महायुतीचे थेट सरपंचपदाचे उमेदवार प्रमोद भिंगारकर यांच्यासह सदस्यांना विजयी करा, असे आवाहन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारादरम्यान केले, तर या वेळी प्रमोद भिंगारकर यांनी विचुंबे ग्रामपंचायत टँकरमुक्त करू, अशी ग्वाही दिली.

पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. विचुंबे येथील निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि रिपाइं महायुतीच्या थेट सरपंचपदाचे उमेदवार प्रमोद भिंगारकर तसेच सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक ०१ मधून निकिता म्हात्रे, श्याम म्हात्रे, संदीप पाटील; प्रभाग २ मधून ज्योती भोईर, कंकेश गोंधळी, प्रितेश भिंगारकर; प्रभाग ३मधून श्रावणी भोईर, प्रगती गोंधळी, अनिल भोईर; प्रभाग ४ मधून विभुती सुरते, आरती गायकवाड, नितीन भोईर आणि प्रभाग 5मधून भाग्यश्री भोईर, भावना साधू, अनंता गायकवाड उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली होती.

या रॅलीत भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रल्हाद केणी, एस.के.नाईक, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, अजय बहिरा, माजी जि.प. सदस्य अमित जाधव, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, माजी उपसरपंच किशोर सुरते, अप्पा भागीत, के.सी.पाटील, नितीन भोईर, डी.के.भोईर, विवेक भोईर, नयन भोईर, राम म्हात्रे, महेश भिंगारकर, अविनाश गायकवाड, चेतन सुरते, जयवंत भिंगारकर, प्रल्हाद भोईर, आनंद गोंधळी, जगदीश भोईर, प्रेम भिंगारकर, हरेश जळे, महेंद्र म्हात्रे, संदीप भिंगारकर, चेतन भिंगारकर, अमिता म्हात्रे, अक्षता गायकवाड, संगीता भोईर, नवीता भोईर, सुनीता भोईर, मानसी भोईर, सोनम म्हात्रे, हर्षदा भिंगारकर, प्रतिभा म्हात्रे, शर्मिला जाधव, बनाकाकू म्हात्रे, स्वाती सुरते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर