दीपावली सणाच्या निमित्ताने स्मशान शेड आणि बस स्थानक यांची स्वच्छता करण्यात आली तसेच यापुढे ही राहिलेल्या ठिकाणी स्वच्छता करणार आहोत - महादेव पाटील
स्वच्छ गाव स्वच्छ देश या उक्तीप्रमाणे महादेव पाटील आणि त्यांचे ग्रामस्थ यांची गावाकऱ्यांना स्वच्छ दिवाळी भेट...
दीपावली सणाच्या निमित्ताने स्मशान शेड आणि बस स्थानक यांची स्वच्छता करण्यात आली तसेच यापुढे ही राहिलेल्या ठिकाणी स्वच्छता करणार आहोत - महादेव पाटील
म्हसळा / रायगड मत
खारगावं खुर्द ग्रामविकास जनसेवा मंडळाचा ग्रामस्वच्छता अभियान सातत्याने सुरू असल्याचे पहायला मिळत आहे शासनाच्या स्वछता अभियानाला खऱ्या अर्थाने या मंडळाने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे दिसून येतो आज दि.10/11/2023 रोजी येणाऱ्या दीपावली सणाच्या निमित्ताने स्मशान शेड आणि बस स्थानक यांची स्वच्छता करण्यात आली तसेच यापुढे ही राहिलेल्या ठिकाणी स्वच्छता करणार आहोत .गावाची स्वच्छता करण्यासाठी जनसेवा मंडळ कार्यरत आहे त्यामध्ये गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला तर गाव चांगल्या प्रमाणात स्वच्छ राहील गावात साथीचे आजार पसरण्यास आळा बसेल या
मंडळाने पुढाकार घेऊन स्वच्छतेचे व्रत घेतले आहे त्यात नागरिकांनी सहभाग नोंदवावा आणि गाव स्वच्छ करण्यासाठी शासनाला आणि मंडळाला सहकार्य करावे आजच्या स्वच्छता मोहीम यशस्वी राबविण्यासाठी श्री महादेव पाटील,श्री चंद्रकांत कांबळे, श्री कृष्णा म्हात्रे, श्री विश्वास खोत, श्री मंगेश म्हात्रे बाळा मेंदडकर आणि आदिवासी बांधव इतर ग्रामस्थ यांनी सहकार्य केले
त्या सर्वांचे मनपूर्वक आभार
Comments
Post a Comment