# श्रीवर्धन - रायगड मधे आज राजकीय महाभूकंप # शरद पवार आणि Team इंडिया मैदानात # सुनील तटकरे क्लीनबोल्ड होणार का? # श्रीवर्धनमध्ये होणार इंडिया आघाडीची सभा # दुपारी 3 वाजता प्रचाराचा नारळ फुटणार # बंडखोरी केल्यानंतर खा. सुनील तटकरे यांच्या मतदार संघात इंडिया आघाडीची होणारी ही पहिलीच सभा
# श्रीवर्धन - रायगड मधे आज राजकीय महाभूकंप
# शरद पवार आणि Team इंडिया मैदानात
# सुनील तटकरे क्लीनबोल्ड होणार का?
# श्रीवर्धनमध्ये होणार इंडिया आघाडीची सभा
# दुपारी 3 वाजता प्रचाराचा नारळ फुटणार
# बंडखोरी केल्यानंतर खा. सुनील तटकरे यांच्या मतदार संघात इंडिया आघाडीची होणारी ही पहिलीच सभा
# माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीस अवजड मंत्री अनंत गीते, आ. अबु आझमी, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी खा. हुसेन दलवाई, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडीत पाटील, माजी. आ. बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
श्रीवर्धन (रायगड मत)
जितेंद्र नटे
गेली अनेक वर्षे रायगड म्हटलं कि सुनील तटकरे हेच शरद पवार यांना आणायचे. कारण ते त्यांचे विश्वासू साथीदार मानसपुत्र समजले जायचे. मात्र गेल्या 30 / 35 वर्षात हे पहिल्यांदाच घडत आहे. जाणून खूप दुःख ही सर्वांना वाटत आहे. कदाचित सुनील तटकरे यांचे उर भरूनही आले असेल. काळजावर दगड ठेवून ते वेळ मारून नेत असतील. शरद पवार येत आहेत आणि त्यांना चक्क जयंत पाटील कट्टर विरोधक हे आणत आहेत. ज्यांनी सुनील तटकरे यांना सिंचन घोटाळा आरोप प्रकरणात हैराण करून सोडले. तेच आज शरद पवार यांच्या बरोबर आहेत. तर सुनील तटकरे त्यांच्या विरोधात. अजूनहो लोकांचा विश्वास बसत नाही. हे खरे आहे कि धुलफेक. कारण राजकारनीं आपली पोळी शेकवायला कुठल्याही थराला जाऊ शकतात. भांडत बसतो तो फक्त सामान्य कार्यकर्ता.
असो मात्र आज चमत्कार घडणार आहे.
आरडीसीसी बँकेच्या श्रीवर्धन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बंदोबस्तासाठी पोलीस फौजफाटा तैनात शाखेच्या उदघाटनंतर कोकण उन्नती मित्र मंडळ, मुंबई यांच्या पटांगणात दुपारी 3 वाजता जाहीर सभा होणार आहे. सभेसाठी मोठा मंडप उभारण्यात आला असून सभेची जय्यत तयारी सुरु आहे. येणाऱ्या मान्यवरांसाठी झेड प्लस सुरक्षा तैनात केली असून मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये 2 उपविभागीय पोलीस अधीक्षक, 5 पोलीस निरीक्षक, 14 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 136 पोलीस आंमलदार तर कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून 40 वाहतूक शाखेचे पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
आरडीसीसी बँकेच्या श्रीवर्धन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी इंडिया आघाडीचे नेते शुक्रवारी प्रथमच रायगड जिल्ह्यात एकत्र येणार आहेत. जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडिया आघाडीच्या रायगडातील प्रचाराला त्यादिवशी सुरुवात होणार असून त्याचा श्रीगणेशा श्रीवर्धनमधून होणार असल्याचं बोललं जात आहेे.
अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर खा. सुनील तटकरे यांच्या मतदार संघात इंडिया आघाडीची होणारी ही पहिलीच सभा आहे. इंडिया आघाडीतील दिग्गज नेतेमंडळी या सभेस उपस्थित राहणार आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रीवर्धन शाखेचे उद्घाटन आज शुक्रवारी संपन्न होणार आहे. हा सोहळा माजी कृषीमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीस अवजड मंत्री अनंत गीते, आ. अबु आझमी, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी खा. हुसेन दलवाई, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडीत पाटील, माजी. आ. बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या क्रार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन आरडीसीसी बँकेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील व उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी केले आहे.
श्रीवर्धन मध्ये सुनील तटकरे आणि कुटुंब यांचा जनसंपर्क तगडा आहे. त्यामुळे येथे गड फोडणे एवढा सोपे काम नाही. बघुयात आज कोण कोण कुणावर तोफा डागतात त्या. आणि त्या तोफना कशा प्रकारे तटकरे सामना करतात त्या. शरद पवार यांच्याच तालमीत तयार झालेले सुनील तटकरे यांना क्लीन बोल्ड करणे एवढे सोपे नाही भल्या भल्यांना त्यांनी रिटायर्ड शिप दिलेली आहे...
---------------------------
वाचा फक्त रायगड मत
संपादक जितेंद्र नटे
raigadmat.page
----------------------------
Comments
Post a Comment