श्रीवर्धन मतदार संघातील विकासकामांसाठी ५७ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद - अदिती तटकरे
श्रीवर्धन मतदार संघातील विकासकामांसाठी ५७ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद - अदिती तटकरे
श्रीवर्धन : मतदार संघातील प्रादेशिक पर्यटन विकासकामांची बैठक नुकतीच गुरुवारी मंत्रालयातील दालनात झाली. यावेळी रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटन विकासांतर्गत श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगांव, रोहा येथील विविध विकासकामे सुरू असून यासाठी ५७ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद केली आहे. ही कामे विहित वेळेत प्राधान्याने पूर्ण करावीत, असे आदेश या बैठकीत देण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक नगरपालिका, रायगड पाटबंधारे विभाग,जिल्हा परिषद, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि पर्यटन संचालनालय यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रादेशिक पर्यटनाच्या विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश देण्यात आले.
Comments
Post a Comment