पनवेल तालुका पोलिसांनी गणेश विसर्जनावेळी ऑनलाईन होणार्‍या फसवणुकीपासून सावध रहा असे संदेश देणारे फलक लावून केली जनजागृती




 पनवेल तालुका पोलिसांनी गणेश विसर्जनावेळी ऑनलाईन होणार्‍या फसवणुकीपासून सावध रहा असे संदेश देणारे फलक लावून केली जनजागृती

पनवेल,  (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील गणेशाचे विसर्जन आज अत्यंत धार्मिकतेने व सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्रितपणे येवून ढोल ताशाच्या गजरात नृत्य करत करण्यात आले. यावेेळी ऑनलाईन होणार्‍या फसवणुकीपासून सावध रहा असे संदेशही जनजागृती फलक लावून यावेेळी देण्यात आले.

सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या सहभागाने वपोेनि अनिल पाटील, वपोनि जगदीश शेलकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात विराजमान झालेेल्या गणेशाची आरती करून शहरातील बल्लाळेश्‍वर मंदिर येथे विसर्जनासाठी मिरवणुक काढण्यात आली. सदर मिरवणूूक काढताना सुद्धा पोलिसांनी प्रथम नागरिकांचा विचार केला. या मिरवणुकीच्या माध्यमातून चांगला संदेश जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याांनी ऑनलाईन होणार्‍या फसवणुकीपासून सावध रहा असे संदेश देणारे फलक गाड्यांना लावून त्याद्वारे जनजागृती केली. यावेळी या विसर्जनात सर्व पोलीस बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. गेले 12 दिवस बंदोबस्तामुळे दमलेले, थकलेले पोलीस बांधव या विसर्जनाच्या वेळी मोठ्या उत्साहात सहभागी होवून पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष आपला आनंद द्विगुणीत केला. 

फोटो ः तालुका पोलीस ठाण्याची जनजागृती मोहिम

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर