# प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा # विधानसभा वॉरियर्सची बैठक घेणार म्हणजे आमदारकी खासदारकी एकत्र होणार कि काय? # अत्यंत महत्वाची सभा होणार...
# प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा
# विधानसभा वॉरियर्सची बैठक घेणार म्हणजे आमदारकी खासदारकी एकत्र होणार कि काय?
# अत्यंत महत्वाची सभा होणार...
पनवेल (प्रतिनिधी) महाविजय २०२४ च्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुधवारी (दि. ११) पनवेलमध्ये संघटनात्मक दौरा होणार आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात महाविजय २०२४ अंतर्गत लोकसभा मतदार संघाची बांधणी सुरू आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय पातळीवर ४०० प्लस तर महाराष्ट्र राज्यात ४५ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट केले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या ३३ मावळ लोकसभा मतदार संघात बुधवारी त्यांचा दौरा होणार असून त्यांच्या या दौर्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. त्यानंतर पनवेल शहरात ’घर घर चलो संपर्क’ अभियान व ’मेरी माटी मेरा देश’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात प्रदेशाध्यक्षांसोबत पनवेल, उरण, कर्जत या तीनही विधानसभेतील हजारो कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सहभागी होणार आहेत. त्या अनुषंगाने होणारी हि रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हुतात्मा हिरवे गुरुजी चौक - विरुपाक्ष मंदिर- रोनक झेरॉक्स कॉर्नर- त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा अशी मार्गक्रमण करणार आहे. या ठिकाणी कॉर्नर सभा होणार आहे. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर ते पनवेल मधील काही परिवाराच्या भेटी घेणार आहेत. पक्षाची माहिती, ध्येय धोरणे बुथ मधील शेवटच्या नागरिकापर्यंत माहिती व्हावी, याकरिता विधानसभा मतदार संघातील तीन ते चार बुथची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आलेल्या विधानसभा वॉरियर्सची बैठक स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेणार आहेत. या दौऱ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रदेशाध्यक्षांचे पनवेल नगरीत जोरदार स्वागत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले असल्याची माहिती लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी दिली.
Comments
Post a Comment