करंजाडे परिसराचा वाढत विस्तार पाहता येथे अत्याधुनिक पद्धतीने उभारलेली पोलीस चौकी सर्वांसाठी उपयुक्त ठरणार- पोलीस उपायुक्त परिमंडळ - २ चे उपायुक्त पंकज डहाणे





करंजाडे परिसराचा वाढत विस्तार पाहता येथे अत्याधुनिक पद्धतीने उभारलेली पोलीस चौकी सर्वांसाठी उपयुक्त ठरणार- पोलीस उपायुक्त परिमंडळ - २ चे उपायुक्त पंकज डहाणे*

पनवेल  (संजय कदम): करंजाडे परिसराचा वाढत विस्तार आणि लोकसंख्या पाहता या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने पोलीस चौकी उभारणे गरजेचे होते व हे काम लोकसहभागातून येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केल्याने याचा फायदा येथील नागिरकांना निश्चितच होईल असे मत पोलीस उपायुक्त परिमंडळ - २ चे उपायुक्त पंकज डहाणे यांनी पोलीस चौकीच्या उदघाटन प्रसंगी केले दरम्यान या पोलीस चौकीच्या नूतनीकरणासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन येथील कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. 

       या उदघाटन प्रसंगी पोलीस उपायुक्त परिमंडळ - २ चे उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, करंजाडे सरपंच मंगेश शेलार, पोलीस पाटील कुणाल लोंढे, विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कामत, सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात, पोलीस उपनिरीक्षक दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक चौगुले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत अहिरे आदींसह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

फोटो: पोलीस चौकी उदघाटन

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर