#‘अजित दादा उद्याच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार काय.....?



#‘अजित दादा उद्याच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार कि काय.....?


#‘अजित दादा उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार..... की काय, असं वाटू लागलंय बुवा’, असं शिवसेना आमदाराचं वक्तव्य समोर आले आहे.


# येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये दादा हे मुख्यमंत्री होणार नाहीत.


मुबंई मंत्रालय (रायगड मत)

आशा बाळगून बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे कधीना कधी एकदा नक्की मुख्यमंत्री बनतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले होते. अजित पवार मुख्यमंत्री होणार, अशा चर्चा वारंवार सुरु असतात. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील बोलताना चुकून अजित पवार यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर आता या सर्व घटनांवर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी “अजित दादा उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की काय, असं वाटू लागलंय”, अशी उपरोधित प्रतिक्रिया दिली.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री होणार, अशा चर्चांना सातत्याने उधाण येताना दिसत आहे. याबाबत शिवसेना नेते संजय शिरसाट यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न रायगड मत ने केला. यावेळी त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली.


“तुम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्या तोंडातून निघालेल्या शब्दाचा एवढा बाहू का करताय? अजित दादा उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात की काय? असं असं वाटू लागलं आहे बुवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी एकदा देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


‘पुन्हा एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री होणार’ आहेत.... क्या बात 


“मनामध्ये असं बोलून कोणी मुख्यमंत्री होत नसतो. त्यासाठी तुमचा असलेला एक स्टॅन्ड, तो राजकीय घटनेची संबंधित असला तर तुम्हाला ती संधी मिळते. पण येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये दादा हे मुख्यमंत्री होणार नाहीत. मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहतील. त्यांच्याच नेतृत्वात विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढवली जाणार आहे”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


‘राष्ट्रवादीत अजित पवार यांची गळचेपी झाली’


अजित पवार एवढे ईडीला घाबरुन सत्तेत सहभागी झाले, असा दावा शरद पवारांनी स्वतः केला. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. “तपास यंत्रणाला घाबरून कशाला जायला पाहिजे? शरद पवारांना ईडीची नोटीस आली नव्हती का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली नव्हती का? ईडीची नोटीस अनेक लोकांना गेलेली आहे. ईडीची नोटीस आली म्हणून घाबरून पळायचं काहीच कारण नाही”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अजित पवार गटावर टीका केली. 



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर