महेंद्र घरत यांच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या नवरात्रौत्सवाला ऑस्ट्रेलियन पाहुण्यांची भेट!





महेंद्र घरत यांच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या नवरात्रौत्सवाला ऑस्ट्रेलियन पाहुण्यांची भेट!


 

उरण (रायगड मत)

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या उलवे नोड येथे साजरा होत असलेल्या नवरात्रौत्सवाला ऑस्ट्रेलिया येथील पॉल यांनी भेट दिली व नवरात्रौत्सवातील गरबा - दांडियाचा आनंद लुटला. यावेळी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या नवरात्रोत्सव कमिटी तर्फे, परदेशी पाहुण्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. या वेळी आपल्या मनोगतात पॉल यांनी महेंद्र घरत यांच्या आंतरराष्ट्रीय कामगार क्षेत्रातील कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. आयटीएफ , आयएलओ या जगातील श्रेष्ठ संघटनांवर भारतीय कामगार चळवळीचे नेतृत्व करत आपला दबदबा जागतिक पातळीवर उमटवीत आहेत. परंतु तरीही त्यांची नाळ या मातीशी जोडलेली आहे. समाजातील गोरगरिबांनी आनंद साजरा करावा म्हणून ते नवरात्रोत्सवाचे आयोजन करून जनतेला आनंद देत आहेत . तर रुग्णवाहिका, गोरगरिबांना शिक्षणासाठी मदत अनेक बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचे अलौकिक काम ते करीत आहेत. म्हणूनच कामगार क्षेत्रातील जागतिक नेतृत्व त्यांच्या प्रेमात आहेत आणि आम्ही त्यांच्या सोबत काम करीत आहोत ते आमचे मित्र असल्याचा सार्थ अभिमान आहे.असे गौरवोदगार त्यांनी यावेळी काढले.यावेळी दिल्ली येथील अरविंद कौशल, मिलिंद पाडगांवकर, अखलाक श्रीलोत्री, किरीट पाटील, वैभव पाटील, अनिलशेठ घरत, गणपतशेठ घरत, मनोज फडकर आदि मान्यवर उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर