रायगड जिल्हा मध्यवर्ती सह. बँक अलिबाग, शाखा श्रीवर्धन हीचे स्व-मालकीच्या जागेत स्थलांतर.* .......*उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधला निशाणा*




रायगड जिल्हा मध्यवर्ती सह. बँक अलिबाग, शाखा श्रीवर्धन हीचे स्व-मालकीच्या जागेत स्थलांतर.* .......*उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधला निशाणा*

रायगड मत

श्रीवर्धन प्रतिनिधी (राजू रिकामे) ;

      दि.२७ ऑक्टोबर २०२३ रायगड जिल्हा मध्यवर्ती सह. बँक अलिबाग, शाखा श्रीवर्धन याचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर करण्यात आले यावेळी उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे रायगड जिल्हा बँकेच्या नव्या इमारतीच्या स्थलांतरच्या निमित्ताने श्रीवर्धन दौऱ्यावर आले होते. श्रीवर्धन येथे त्यांच्या या दौऱ्यादरम्यान कोकण उन्नती मित्र मंडळ च्या भव्य अशा प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, नरेंद्र मोदी काल शिर्डीच्या दौऱ्यावर आले असताना मोदींनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्ये केले पण त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं नाही. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. आरक्षणासाठी लोकं रस्त्यावर उतरली आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलायचं नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. व्यासपीठावर मी शिवसेनेकडून आहे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून आहेत. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसकडून आहेत. जयंत पाटील शेकाप पक्षाकडून आहेत. शिवसेना आणि शेकाप पक्षाच्या एकेकाळी अगदी मारामाऱ्या झाल्या होत्या. येऊन दाखवा, असे अनेक चॅलेंज दिले होते. हे सगळं झालं आहे. एवढी वर्ष गेल्यानंतर सुद्धा आम्ही एका व्यासपीठावर येऊ शकलो आणि आलो याचं कारण असं की, त्या सर्व मारामाऱ्या आणि विरोध व्यक्तीगत नव्हता”, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं.

 “सूडाच राजकारण कधी कुणीच केलं नाही. म्हणजे शरद पवार आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री जगजाहीर आहे. तशी माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले आणि बाळासाहेब ठाकरेंची मैत्री उघड होती. उघड पाठिंबा दिला होता. पण जिथे मतं पटायची नाहीत तिथे मताला विरोध केला जायचा. आताचं जे सुरु आहे, विरोधक असतील तर संपवूच, पण सोबत असतील त्याना सुद्धा संपवू हे समीकरण, मी करण चालू आहे. माझ्याशिवाय कुणीच नको”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.                      

“पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सुद्धा महाराष्ट्रात शिर्डीला येऊन गेले. मला खरी अपेक्षा अशी होती की, ते आता जो प्रश्न आरक्षणाचा प्रश्न धुमसतोय, त्या आरक्षणावर ते काही बोलतील. कारण हा त्यांच्या अखत्यारितला प्रश्न आहे. पण ते आरक्षणावर काहीच बोलले नाहीत. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. जो काही ज्वलंत प्रश्न आहे त्यावर बोलायचं नाही. मणिपूर पेटतंय. पण बोलायचं नाही. आरक्षणासाठी लोकं रस्त्यावर उतरली आहेत, आत्महत्या करत आहेत. पण बोलायचं नाही. जणू मी त्या गावचाच नाही, असं बोलून निघून जायचं”, अशी टीका ठाकरेंनी केली.


“पवार साहेब एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल काल त्यांनी ७० हजार कोटींचा उल्लेख केला नाही. राष्ट्रवादीवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याची टीका केली होती. पण बाजूला कोण बसलं होतं?, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.


“त्यांनी कुठून काढलं की, शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काही केलंच नाही. त्यावेळी शिवसेना सुद्धा आंदोलन करत होती. शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री होते. ए. आर. अंतुले यांच्यावेळी तर मी लहान होतो. पण मला जे आठवतंय, मनमोहन सिंह पंतप्रधान होते. शरद पवार कृषीमंत्री होते. तेव्हा पहिल्यांदा देशात ७० हजार कोटींची कर्जमाफी शरद पवारांनी केली आहे. जणू काही आजपर्यंत कोण झालेलच नाही. जे काही होतंय ते मी आल्यानंतर होतंय. नळाला पाणीसुद्धा आताच येतंय. गंगा नदी सुद्धा आताच अवतरली आहे. असा काही अभास निर्माण केला जातोय. लोकं एवढी मुर्ख नाहीत. सूडाने राजकारण करायचं. शेतकऱ्यांचा आसूड कडाडला की भलेभले झोपून जातात. तिकडे कुणाचं चालत नाही. सर्वसामान्यांच्या ताकदीपुढे भल्याभल्यांना झुकावं लागतं”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी व्यापीठावर मा.खा. अनंत गीते, मा.आ. भाई जयंत पाटील, मा.आ. मुश्ताक अंतुले, मा.आ. पंडीत शेट पाटील, मा.आ. बळीराम पाटील, मा.आ. रवींद्र वायकर, मा.आ. सुरेश लाड व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर