पनवेल तालुका पोलिसांची जबरदस्त कामगिरी अवघ्या १५ दिवसात महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या २ टोळ्यांना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड






पनवेल तालुका पोलिसांची जबरदस्त कामगिरी 


अवघ्या १५ दिवसात महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या २ टोळ्यांना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल (संजय कदम): अवघ्या १५ दिवसांत पनवेल परिसरातील एक्सप्रेस महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या २ वेगवगेळ्या टोळ्यांना पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केल्याने वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

 पनवेल जवळील पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील जेएनपीटी पनवेल एक्झिट येथे लघुशंकेसाठी थांबलेल्या ट्रक चालकासह त्याच्या भावाला अज्ञात त्रिकुटाने मारहाण करून लुटल्याची घटना ४ दिवसांपूर्वी घडली होती. त्यामध्ये ट्रक चालक असीर मो. बशीर खान (51) हा त्याचा भाऊ हे त्यांच्या ताब्यातील ट्रक क्र.एमएच-43-वाय-7123 हे पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील जेएनपीटी पनवेल एक्झिट येथे थांबून लघुशंकेकरिता गेले असता तीन अनोळखी इसमांनी संगनमत करून त्यांना धक्काबुक्की व हाताने मारहाण करून त्याच्या भावाकडून व त्यांच्या ट्रकमधून रोख रक्कमेसह मोबाईल फोन असा मिळून जवळपास 15 हजार रुपये किंमतीचा ऐवज जबरीने चोरुन ते पसार झाले होते. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यातक्रारी नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोहवा महेश धुमाळ, पोहवा विजय देवरे, पोहवा सुनील कुदळे, पोशी आकाश भगत आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे या आरोपींचा शोध घेतला असताना आरोपी स्वप्नील वाघमारे(वय रा.ढोणे वाडी) प्रवीण पवार (वय २०) रा ढोणे वाडी व एक विधिविसर्ग बालक हे तिघेजण या गुन्ह्यातील मुख्य आरोपीअसून ते ढोणेवाडी परिसरात लपले असल्याची माहिती या पथकाला मिळताच त्यांनी सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन असा १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे या गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली, वेगवगेळ्या कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या पूर्वी सुद्धा त्यांनी असे गुन्हे केले आहेत का याचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत. दरम्यान १५ दिवसांपूर्वीसुद्धा अश्याच प्रकारे महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीला याच पथकाने ताब्यात घेतले होते. अवघ्या १५ दिवसात पनवेल तालुका पोलिसांनी २ टोळ्या जेरबंद जॆल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 

फोटो: महार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीसह पोलिसांचे पथक

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर