खारगावं खुर्द ग्रामविकास जनसेवा मंडळाचा ग्रामस्वच्छता अभियान सातत्याने सुरू.. महादेव पाटील म्हणजे स्वच्छता दुतच.. ग्रामपंचायत पेक्षा लोकांनी मानले आभार..







खारगावं खुर्द ग्रामविकास जनसेवा मंडळाचा ग्रामस्वच्छता अभियान सातत्याने सुरू..

महादेव पाटील म्हणजे स्वच्छता दुतच..

ग्रामपंचायत पेक्षा लोकांनी मानले आभार..

म्हसळा (रायगड मत)

खारगावं खुर्द ग्रामविकास जनसेवा मंडळाचा ग्रामस्वच्छता अभियान सातत्याने सुरू असल्याचे पहायला मिळत आहे शासनाच्या स्वछता अभियानाला खऱ्या अर्थाने या मंडळाने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे दिसून येतो आज द  घटस्थापना सणाच्या निमित्ताने गावदेवी मंदिर रस्ता आणि बस स्थानक यांची स्वच्छता करण्यात आली तसेच मुख्य रस्त्याला लगत वाहनांना अडसर असणारी झाडे झुडपे स्वच्छ करण्यात आली शासनाने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत जसा आपण सर्व ग्रामस्थ सहभागी होतो त्याच प्रमाणे गावाची स्वच्छता करण्यासाठी जनसेवा मंडळ कार्यरत आहे त्यामध्ये गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला तर गाव चांगल्या प्रमाणात स्वच्छ राहील गावात साथीचे आजार पसरण्यास आळा बसेल या

मंडळाने पुढाकार घेऊन स्वच्छतेचे व्रत घेतले आहे त्यात नागरिकांनी सहभाग नोंदवावा आणि गाव स्वच्छ करण्यासाठी शासनाला आणि मंडळाला सहकार्य करावे आजच्या स्वच्छता मोहीम यशस्वी राबविण्यासाठी श्री महादेव पाटील,श्री चंद्रकांत कांबळे, श्री कृष्णा म्हात्रे, श्री विश्वास खोत, श्री मंगेश म्हात्रे, श्री वसंत म्हात्रे श्री योगेश मेंदडकर, श्री जयवंत खोत,श्री हरीश म्हात्रे आणि इतर ग्रामस्थ यांनी सहकार्य केलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर