कोल्ही गाव हे स्वतंत्र गाव म्हणून घोषित करून ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्याची ग्रुप ग्रामपंचायत पारगाव यांची खा.श्रीरंग बारणे यांच्याकडे मागणी




कोल्ही गाव हे स्वतंत्र गाव म्हणून घोषित करून ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्याची ग्रुप ग्रामपंचायत पारगाव यांची खा.श्रीरंग बारणे यांच्याकडे मागणी

पनवेल (वार्ताहर) : कोल्ही गाव हे स्वतंत्र गाव म्हणून घोषित करून ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्याची ग्रुप ग्रामपंचायत पारगाव यांच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांनी खा. श्रीरंग बारणे यांच्याकडे  निवेदनाद्वारे  केली आहे.

                सामाजिक कार्यकर्ते बाळाराम नाईक यांच्यासह, हितेश नाईक, साहिल नाईक आदींनी खा. श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन त्यांना सरपंच  अहिल्या बाळाराम नाईक यांच्या मागणीचे हे पत्र दिले. या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि ग्रुपग्रामपंचायत पारगाव ता. पनवेल हद्दीत कोल्ही हे गाव आंतरराष्ट्रीय विमानतळात मोडत असल्याने त्याचे पुनर्वसन झाले आहे. सदरचे पुनर्वसन वडघर हद्दीतील झाले आहे. तरी सदरचे कोल्ही गाव म्हणून घोषित करावे व त्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आणावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच यावेळी ग्रामसभा ठराव प्रत सुद्धा जोडली आहे. या निवेदनाची खा. श्रीरंग बारणे यांनी दखल घेत या मागणी संदर्भात  स्वतःचे पात्र तयार करून ते मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल  व पाठपुरावा केला जाईल असे अश्वासन त्यांनी दिले आहे. 

फोटो - खा. श्रीरंग बारणे यांची बाळाराम नाईक यांनी घेतली भेट

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर