मा. नगरसेवक राजू सोनी यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून चाळीस वर्षे जुन्या मंदिराचे केले नूतनीकरण*
मा. नगरसेवक राजू सोनी यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून चाळीस वर्षे जुन्या मंदिराचे केले नूतनीकरण*
पनवेल (वार्ताहर): पनवेल महापालिकेचे मा. नगसेवक राजू सोनी यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून चाळीस वर्षे जुन्या मंदिराचे नूतनीकरण केले आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात येत आहे.
कोणतीही देणगी न घेता स्व खर्चाने नवनाथ नगर रेल्वे स्टेशन रोड येथील वाघरी समाज यांचे चाळीस वर्षांपूर्वी चे जुने दुर्गा माता मंदिरयामध्ये मा नगरसेवक राजू सोनी यांनी सर्व मंदिराचे नवीन काम करून दिले तसेच वर पत्र्याची नवीन शेड बनवून दिली नवीन टाइल्स बसवण्यात आल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे पनवेल शहरातील सर्व झोपडपट्टीवासियांनी तसेच सर्व महिला भगिनी व नागरिकांनी आभार मानले आहेत. राजू सोनी यांनी आत्तापर्यंत लक्ष्मी वसाहत येथील लक्ष्मी आई मंदिर, दुर्गा माता मंदिर व श्री मारुती मंदिर, इंदिरानगर येथील यल्लमा माता मंदिर, रेणुका माता मंदिर, नवनाथ नगर दुर्गा माता मंदिर ,असे पनवेल शहर व पनवेल तालुक्यातील बरीच मंदिरांसाठी देणगी दिली आहे. त्याबद्दल त्यांचे पनवेल महानगर झोपडपट्टी व जीर्ण चाळी स्थानिक रहिवासी संघटना अध्यक्ष तथा शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख भरत जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक महावीर भाई गुप्ता यांनीही राजू सोनी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो: मंदिर नूतनीकरण
Comments
Post a Comment