पनवेल महानगर पालिका क्षेत्रांमधील सिडको हद्दीतील प्रभाग नं. १७ मधील सिडकोकडून हस्तांतरीत झालेल्या गार्डनची दुरावस्थेबाबत मा. नगरसेवक अॅड. मनोज कृष्णाजी भुजबळ यांनी केला संताप व्यक्त
पनवेल महानगर पालिका क्षेत्रांमधील सिडको हद्दीतील प्रभाग नं. १७ मधील सिडकोकडून हस्तांतरीत झालेल्या गार्डनची दुरावस्थेबाबत मा. नगरसेवक अॅड. मनोज कृष्णाजी भुजबळ यांनी केला संताप व्यक्त
पनवेल ( संजय कदम ) : सिडकोने त्यांच्या ताब्यातील पनवेल महानगरपालिका क्षेत्रांतील जवळ जवळ सर्व गार्डन पनवेल महानगरपालिके कडे सुपूर्त केलेले आहेत. त्यामुळे सिडकोने उन्हाळयात सदर सर्व गार्डनचे पाणी बंद केल्याने सर्व गार्डनमधील झाडे व गवत (लॉन) सुकून गेलेली आहेत. आता पावसाळयामध्ये प्रत्येक गार्डनमध्ये प्रचंड गवत व झुडूपे वाढलेली आहेत. त्यामुळे गार्डनमधील पाथवेवर वेगवेगळया जातींचे साप बसत आहेत. त्यातील काही साप प्रचंड विषारी असल्याचे जाणकारांकडून समजले आहे व त्याबाबत बऱ्याच महिला व ज्येष्ठ नागरीक यांच्या तक्रारी येत आहेत. तरी याबाबत पनवेल महानगर पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करावी अश्या मागणीचे पत्र महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना मा. नगरसेवक अॅड. मनोज कृष्णाजी भुजबळ यांनी दिले आहे .
या निवेदनात भुजबळ यांनी म्हंटले आहे की ,सध्या प्रभाग १७ मधील सेक्टर नं. १२, १३, १४, १५, १५, १६, १८ व १९ मधील गार्डनमध्ये गवत, झाडी झुडूपे तसेच पाथवे नादुरुस्त अशी परिस्थिती झालेली आहे. काही गार्डनमध्ये म्हणजेच सी - ५, ए - टाईप, सेक्टर नं. १३, पी-६, सेक्टर नं. १८ येथे तर मोठी झाडे तुटलेली आहेत तर काही झाडे प्रचंड वाढलेली असून धोकादायक झालेली आहेत.
एकंदरीत सध्या महापालिकेकडे गार्डन / बगीचे आल्यापासून सर्व गार्डनची दुरावस्था झाल्याची चर्चा लोकांमध्ये होताना दिसते. वास्तविकपणे पनवेल महापालिका झाल्यापासून अतिशय चांगले रस्ते, स्ट्रीट लाईट, स्वच्छता व इतर सोयी सुविधा पुरविण्याचे उत्तम काम महापालिकेकडून केलेले आहेत. परंतु, सध्या सर्व गार्डनच्या दुरावस्थेमुळे महापालिका बाबत नाराजी बोलली जाते. तरी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेवून सर्व गार्डनची साफसफाई व वॉचमन ठेवण्याची तजविज करावी अशी मागणी त्यांनी केली आहे .
Comments
Post a Comment