म्हसळा हादरला.... म्हसळ्यात गो-हत्या, आरोपीला पोलिसांनी पकडले




म्हसळा हादरला....

म्हसळ्यात गो-हत्या, आरोपीला पोलिसांनी पकडले 


 म्हसळा (रायगड मत)

म्हसळा तालुक्यातील वरवठणे येथे गोहत्याचा प्रकार घडला मात्र वरवठणे पंचक्रोशीतील हिंदू बांधवांच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस आली. त्याची तक्रार म्हसळा पोलीस ठाणे येथे केल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री सोनवणे यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित ठिकाणावर प्रत्यक्ष जाऊन मुद्देमालासह आरोपी याला अटक करून गजाआड केले आहे.

तरी तालुक्यातील सर्व बांधवांनी याबाबत सतर्क राहून गो रक्षण करावे आणि अशा घटना आपल्या परिसरात निदर्शनास आल्यास बांधवांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा आणि आपल्या हिंदू देवतेची गो मातेचे रक्षणासाठी सतर्क राहावे.

काल घडलेल्या घटनेची तात्काळ दखल घेऊन संबंधित आरोपी याला अटक केल्याबद्दल श्री सोनवणे आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देताना दिसत आहेत.

मुळात हे असले बेकायदेशीर आणि समाजासाठी घातक अश्या घटना घडतातच कश्या? कोण आहे याच्या पाठीशी असा प्रश्न सद्या चर्चीला जातं आहे.

या रायगड जिल्ह्यात 7 आमदार हिंदू, खासदार हिंदू आहेत. तसेच अनेक हिंदू समाज संघटना आहेत. मात्र तरीही कसलीही भीती या समाज कंटकांना नाही. गायीचे मुंडके नदीत टाकले होते. कुत्र्यांनी ते नदिकाठी आणले होते जेव्हा ते काही लोकांना दिसलें तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.

इन्स्पेक्टर सोनवणे यांनी लागलीच पोलीस फौंज घेऊन छापा मारला आणि त्या कुकर्मी इसमास ताबडतोब अटक केली. वरवटणे येथे मुद्देमालासह त्यास पकडले. त्यामुळे अनेकांचे धाबे दणानले आहेत.

ज्या अर्थी येथे गोमान्स आणला जातो याचा अर्थ इथे खाणारे आहेत. म्हणजे याठिकाणी छुप्या मार्गाने हा गोरख धंदा चालतो आहे हे निश्चित.

हिंदू संघटना लवकरच मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदवतील....

raigadmat.page





Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर