# खारगाव खुर्द (सकलप) ग्रामपंचायत चे सरपंच ठरले निष्क्रिय: # ग्रामपंचायचा पैसा जातो कुठे? # जनतेचा एकच सवाल? # सरपंचांच्या घरा समोरील रस्ता साफ सफाई करत असताना घरात असून सुद्धा घराच्या बाहेर पडले नाहीत.
# खारगाव खुर्द (सकलप) ग्रामपंचायत चे सरपंच ठरले निष्क्रिय:
# ग्रामपंचायचा पैसा जातो कुठे?
# जनतेचा एकच सवाल?
# सरपंचांच्या घरा समोरील रस्ता साफ सफाई करत असताना घरात असून सुद्धा घराच्या बाहेर पडले नाहीत.
रायगड मत (विशेष प्रतिनिधी)
गेली अनेक दिवस ग्रामस्थ मंडळामध्ये हा विचार धूमसत आहे. सरपंच निष्क्रिय ठरल्याचे दिसत आहे. 5 वर्षे पूर्ण होतील मात्र विकास कामे तर काहीचन नाही. अशी बोंब सकलप, बौदवाडी, नवानगर, सकलप कोंड गवळी वाडी ह्या सर्व वाड्या नाराज आहेत. लोकांनी थेट सरपंच म्हणून केवळ 1 मतांनी विजयी झालेल्या सरपंच यांनी कुठलेही जाणीव ठेवलेली नाही.
नवानगर येथे बेकायदेशीर बिल्डिंग, बेकायदेशीर धंदे कुणाच्या आशीर्वादाने चालू आहेत? हे वेगळे सांगायला नको? याची चौकशी कधी होणार. सद्या गावामध्ये महादेव पाटील हेच सरपंच आहेत कि काय असे वाटू लागले आहे. तेच सर्वत्र धावपळ करून गावचा विकास साधताना दिसत आहेत. सभापती राहिल्यामुळे कदाचित त्यांना काम करण्याचे आणि माणुसकी जपण्याची कला चांगलीच अवगत आहे. राजकारण 20 टक्के आणि समाजसेवा 80 टक्के अशी त्यांची विचारसरनी आहे. गोष्ट कधी लपून राहिली नाही. गेली 30 वर्षाहून अधिक काळ ते येथील गावची सेवा करताना दिसत आहेत.
यांचसाठी त्यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई मोहीम राबवली. खारगावं खुर्द (सकलप) येथील स्मशानभूमी मध्ये गावातील सेवाभावी जनसेवा मंडळाच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. या सेवाभावी मंडळाच्या वतीने गेली 7 ते8 दिवस गावातील रस्ते, एस. टी निवारा शेड, गटार यांची स्वच्छता कार्यक्रम केला जात आहे गावातील रस्ते, गटार आणि स्मशानभूमी, एस टी पिक अप शेड दुरुस्ती आणि स्वच्छता करण्या संबधी ग्रामसभेत ठराव मांडून आणि त्यांच्याकडे वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून लोकांनी सांगितले मात्र सरपंच यांनी जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्याने गावातील सेवाभावी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारण विरहित सेवाभावी मंडळाची स्थापना करून गावाची गेली ७ ते ८ दिवस स्वच्छता करत आहेत.
मात्र गावातील सरपंच हे त्यामध्ये कुठेही सहकार्य करत नाही, सरपंचांच्या घरा समोरील रस्ता साफ सफाई करत असताना घरात असून सुद्धा घराच्या बाहेर पडले नाहीत. त्यामुळे सरपंच गरीब असो वा श्रीमंत असो लोकांचे ऐकणारा असावा अशी जनतेची माफक अपेक्षा आहे.
# खारगावं खुर्द एस टी पिक अप शेडचा पत्रा गेली कित्येक दिवस तुटला होता ग्रामपंचायत ला अनेक वेळा सांगून ही त्याची दुरुस्ती केली नाही मात्र शेवटी ग्रामविकास जनसेवा मंडळाच्या वतीने पत्रा बदलण्यात आला.
# खारगाव खुर्द ग्रामविकास जनसेवा मंडळ यांच्या तर्फे पुन्हा एकदा ग्राम स्वच्छता करण्याचे घेतलेले व्रत अखंड सुरुच आहे दि.25/09/2023 रोजी सोमवारी नरेश मेंदडकर यांच्या घरापासून चिंचबावी कडील रस्त्याकडील स्वछता करण्यात आली गाव स्वच्छता करण्याचे काम ग्रामपंचायतिचे असते त्यामध्ये ग्रामस्थांचे सहकार्य करायचे मात्र इथे ग्रामस्थ गाव स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेतला जातो आणि ग्रामपंचायत याकडे जाणीव पूर्वक डोळेझाक करत आहे.या स्वच्छता मोहीम यशस्वी राबविण्यासाठी श्री महादेव पाटील, नरेश मेंदडकर, कृष्णा म्हात्रे, चंद्रकांत कांबळे, मंगेश म्हात्रे, विक्रम कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद म्हात्रे, नारायण म्हात्रे, आनंद कांबळे आणि आदिवासी बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment