मानपाडा पोलीसांची कारवाई #सेक्स रॅकेट उध्वस्त / ७ बांगलादेशी महीलांची सुटका #५ बांगलादेशी आरोपीसह १ भारतीय गजाआड
#मानपाडा पोलीसांची कारवाई
#सेक्स रॅकेट उध्वस्त / ७ बांगलादेशी महीलांची सुटका
#५ बांगलादेशी आरोपीसह १ भारतीय गजाआड
पनवेल :
दिनांक ०५/१०/२०२३ रोजी बांगला देशातील एन. जी. ओ. च्या
अधिकारी श्रीमती मुक्ता दास यांनी 'फिडम फर्म' या पुण्यातील सामाजिक संस्थेस ई
मेल द्वारे कळविले की, राणा नांवाच्या इसमाने एका १९ वर्षीय बांगलादेशी महीलेस
नोकरीला लावण्याच्या बहाण्याने बांगला देशामधुन भारत देशामध्ये आणुन हेदुटणे
नांवाच्या गांवामध्ये तिला खोलीत डांबुन ठेवुन तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार
केले आहेत. असे ई मेल द्वारे कळविल्यानंतर दिनांक ०६/१०/२०२३ रोजी तिची
सुटका करण्यासाठी 'फिडम फर्म' संस्थेतील समाजसेविका सौ. शिल्पा वानखेडे यांनी
मानपाडा पोलीस स्टेशनला संपर्क साधुन मदतीची मागणी केली. वरिष्ठ पोलीस
निरीक्षक शेखर बागडे यांनी ताबडतोब बांगलादेशी महीलेची सुटका करण्यासाठी
पोलीस पथकाला मार्गदर्शन करून हेदुटणे गांवामध्ये रवाना केले.
मानपाडा पोलीस पथकाने हेदुटणे गांवातील विठ्ठल रूक्मीणी मंदीराजवळ
असलेल्या घर क्रमांक ३२ मध्ये रात्री १२ वा. सुमारास छापा टाकला असता सदर
घराच्या तळमजल्यावर पिडीत महीला व तिच्यासोबत इतर ६ बांगलादेशी महीला
मिळुन आल्या. पोलीसांनी पिडीत महीलांकडे विचारपुस केली असता युनुस शेख उर्फ
राणा याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने या सर्व महीलांना नोकरीचे व उपचाराचे
अमिष दाखवुन बांगलादेशातुन भारत देशामध्ये आणुन हेदुटणे गांवामध्ये डांबुन
ठेवल्याचे समजले. तसेच या महीलांना इतर पुरुषासोबत जबरदस्तीने लैगिंक सबंध
करण्यास लावुन त्याबदल्यात राणा व त्याचे साथीदार लोकांकडुन पैसे घेत असल्याचे
सर्व महीलांनी पोलीसांना सांगितले. राणा व त्याचे साथीदार पलावा सिटी मध्ये
असल्याचे पोलीसांना पिडीत महीलांनी सांगितल्यानंतर पोलीसांनी पलावा सिटी मध्ये
सर्च ऑपरेशन सुरू केले. आरोपींना पोलीसांचा सुगावा लागल्याने ते अंधाराचा
फायदा घेवुन अंतर्ली गांवाबाहेर असलेल्या झाडीझुडपामध्ये पळुन गेले. झाडीमध्ये
अंधार असल्यामुळे तसेच आरोपीची संख्या जास्त असल्यामुळे मानपाडा पोलीसांनी
आणखी मनुष्यबळ व टॉर्च मागवुन रात्री २ वा. ते पहाटे ६ वा. दरम्यान आरोपींचा
अंतर्ली गांवाबाहेरील झाडीझुडपामध्ये शोध घेवुन ५ आरोपीला पकडले. त्यांची नांवे
खालीलप्रमाणे
१) युनूस अखमल शेख उर्फ राणा, वय ४० वर्षे
२) साहिल मिजापुर शेख, वय २६ वर्षे,
३) फिरदोस नुर हुसेन सरदार, वय २४
४) आयुबअली अजगरअली शेख, वय ३५ वर्षे,
५) बिपलॉप हापीजूर खान, वय २४ वर्षे,
यातील मुख्य आरोपी युनुस शेख उर्फ राणा याच्या सांगणेवरून कोणत्याही
वैध कागदपत्र व करारनाम्याशिवाय स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी बांगलादेशी
आरोपींना घर उपलब्ध करून देणारा इसम योगेश बळीराम काळण, वय ३१ वर्षे
यालाही पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर सौ. शिल्पा वानखेडे यांनी दिलेल्या
तक्रारीवरून गु.रजि. क्रमांक ७९७/२०२३ भादवि कलम ३७६ (२) (एन), ३७०,
३७० (अ), ३६५, ३६६, ३६६ (ब), ३६३, ३४४, ३२३, ३४, सह अनैतिक
व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ चे कलम ४, ५ परदेशी नागरीक कायदा
१९४६ चे कलम ३, १४ (अ), १४ (क) सह पारपत्र नियम (भारत प्रवेश ). कलम
४, प्रमाणे गुन्हा दाखल करून एकुण ६ आरोपीतांना अटक केली आहे.
तपासादरम्यान पोलीसांना आरोपीच्या खोलीमध्ये २५ संशयित आधार कार्ड,
१० पॅनकार्ड, ४ जन्मतारखेचे दाखले तसेच बांगलादेश व भारताच्या चलनी नोटा
मिळुन आल्या आहेत.
सदरची कारवाई श्री. दत्तात्रय शिंदे मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व
प्रादेशिक विभाग, कल्याण, श्री. सचिन गुंजाळ, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ
३ कल्याण, श्री. सुनिल कुराडे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली यांचे
मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शेखर बागडे,
पोनि / सुरेश मदने, पोनि / राम चोपडे, पोनि / दत्तात्रय गुंड, सपोनि / अविनाश वनवे,
सपोनि / सुनिल तारमळे, सपोनि / प्रशांत आंधळे, सफौ/ संतोष चौधरी, पोहेकॉ/ राजेंद्र
खिलारे, पोहेकॉ/ संजु मासाळ, पोहेकॉ/ सुनिल पवार, पोहेकॉ/ विकास माळी,
पोहेकॉ/ शिरीष पाटील, पोहेकॉ/ दिपक गडगे, पोना / यल्लप्पा पाटील, पोना / देवा
पवार, मपोहेकॉ/ इरपाचे, पोना / मंदार यादव, पोकॉ/ महेंद्र मंझा, पोकॉ / बहीरम,
पोकॉ/ राठोड, पोकॉ/ जाधव, पोकॉ/नरूळे पोकॉ/ विजय आव्हाड, पोकॉ/ अशोक
अहेर, व सफौ/ धनंजय मोहीते, सफौ / दिपक भोसले ( A.H.T.U THANE) या पोलीस
पथकाने केली आहे.
मानपाडा पोलीसांकडुन घरमालकांना अवाहन
भाडेतत्वावर घर देणाऱ्या घरमालकांनी भाडेकरूंची नीट पडताळणी केल्याशिवाय घर
भाडयाने देवु नये तसेच भाडेकरू ज्या ठिकाणी नोकरी किंवा मजुरी करतो
त्याठिकाणी जावुन त्याची खात्री करावी. भाडेकरूच्या हालचालीबाबत संशय
आल्यास ताबडतोब पोलीसांना कळवावे.
Comments
Post a Comment