नवीन पनवेलमध्ये ’होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमांतर्गत भाजपच्या मनमानी कारभाराचा रहिवाशांनी केला निषेध
नवीन पनवेलमध्ये ’होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमांतर्गत भाजपच्या मनमानी कारभाराचा रहिवाशांनी केला निषेध
पनवेल, (संजय कदम) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा आता पर्दाफाश करण्याची वेळ आली असून, फसव्या योजनांविरोधात ’होऊ जाऊ दे चर्चा’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या गावागावात झाला पाहिजे, या अनुषंगाने पनवेल जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या आदेशाने तसेच नविन पनवेल शहरप्रमुख यतिन देशमुख आणि संघटिका अपूर्वा प्रभू यांच्या नेतृत्वात पनवेल विधानसभा-188 मधील नविन पनवेल शहरात सेक्टर 9 , द्वारका चौक येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी वाढती महागाई, गॅस सिलेंडरचे वाढलेले दर, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती यावरून सरकारवर संधान साधण्यात आले.
या प्रसंगी तालुकाप्रमुख संदीप तांडेल , उपमहानगर प्रमुख किरण तावदरे, शहरप्रमुख यतीन देशमुख, संघटीका अपूर्वा प्रभू, शहर समन्वयक शिवाजी पालांडे , विभाग प्रमुख बिपीन झुरे , उपतालुका संघटिका सुगंधा शिंदे, तनुजा झुरे ,उपशहर संघटिका मालती पिंगळा , विभाग संघटिका वैशाली थळी, शाखाप्रमुख शाम खडकबाण , प्रवीण चोनकर , ओमकार भिडे , गोविंद जोग, जयेश पाटील , सृजन जोशी , ज्ञानेश्वर घनवाट , काशिराम थळी ,शाखा संघटिका सेजल खडकबाण, अलका सानप , मनीषा भुर्के नविन पनवेल शहरातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना , युवती सेना व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत
Comments
Post a Comment