# पत्रकार म्हणून तुम्हाला अधिकार आहे; पण लिखाणात सुसंस्कृतपणा हवा, असा टोमणा तटकरे यांनी राऊत यांना हाणला. # अजित पवार यांच्याविषयी जबाबदारीने बोलत जावे, सुनील तटकरे यांनी संजय राऊत यांना सज्जड दम # ‘सामना’ या मुखपत्रात राऊत यांनी अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा तटकरे यांनी घेतला खरपूस समाचार. # श्रीवर्धन मतदार संघात कोण? शिवसेना कि राष्ट्रवादी शिवसेना कुठली? राष्ट्रवादी कुठली? मतदार झाले संभ्रमित
# पत्रकार म्हणून तुम्हाला अधिकार आहे; पण लिखाणात सुसंस्कृतपणा हवा, असा टोमणा तटकरे यांनी राऊत यांना हाणला.
# अजित पवार यांच्याविषयी जबाबदारीने बोलत जावे, सुनील तटकरे यांनी संजय राऊत यांना सज्जड दम
# ‘सामना’ या मुखपत्रात राऊत यांनी अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा तटकरे यांनी घेतला खरपूस समाचार.
# श्रीवर्धन मतदार संघात कोण? शिवसेना कि राष्ट्रवादी
शिवसेना कुठली? राष्ट्रवादी कुठली? मतदार झाले संभ्रमित
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका करताना सभ्य भाषा वापरावी. अजित पवार यांच्याविषयी बोलताना अथवा लिहिताना त्यांनी आपली पातळी सोडू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे.
‘सामना’ या मुखपत्रात राऊत यांनी अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा तटकरे यांनी समाचार घेतला. अजित पवार यांचा उल्लेख संजय राऊत ‘सिंचनदादा’ म्हणून करत आहेत. मात्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर अजित पवार हे उत्तम काम करीत आहेत, असे हेच संजय राऊत म्हणत होते. अजित पवार यांच्या प्रशासनावर असलेल्या हुकमतीविषयी राऊत त्यांचे कौतुक करत होते. राऊत यांनी दुटप्पीपणा थांबवावा, असे मत तटकरे यांनी व्यक्त के
माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे अशोक चव्हाण, अजित पवार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत भेटले होते. त्यानंतर ठाकरे हे भाजपबरोबर जाण्यास इच्छुक असल्याचे याच संजय राऊत यांनी मला सांगितले होते. त्या वेळी आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकरदेखील त्यांच्याबरोबर होते. मात्र त्या वेळी काय चर्चा झाली ते मी सांगणार नाही. मात्र ते ‘भाजपबरोबर जाणे आवश्यक आहे,’ असे वारंवार सांगत होते, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. पत्रकार म्हणून तुम्हाला अधिकार आहे; पण लिखाणात सुसंस्कृतपणा हवा, असा टोमणा तटकरे यांनी राऊत यांना हाणला.
Comments
Post a Comment