३३ गंभीर दाखल असलेल्या आरोपीस पनवेल शहर पोलीस व उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स, वाराणसी युनिटने संयुक्त कारवाईत केली अटक*
३३ गंभीर दाखल असलेल्या आरोपीस पनवेल शहर पोलीस व उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स, वाराणसी युनिटने संयुक्त कारवाईत केली अटक*
पनवेल (संजय कदम): उत्तर प्रदेश येथील गॅगस्टर अॅक्टचे ३ गुन्हे, दुहेरी खुनासह दरोडा एक गुन्हा दरोडयाचे तीन गुन्हे, हत्येचा प्रयत्न, ७ गुन्हे जबरी चोरी व इतर असे एकुण ३३ गंभीर गुन्हे दाखल असलेला, उत्तर प्रदेश सरकारचे ५० हजारांचे बक्षिस जाहीर असलेला फरार आरोपीत यांस पनवेल शहर पोलीस व उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स, वाराणसी युनिट यांचे संयुक्त कारवाईत अटक.
उत्तर प्रदेश येथील एकुण ३३ गंभीर गुन्हे दाखल असलेला तसेच उत्तर प्रदेश सरकारचे ५० हजारांचे बक्षिस जाहीर असलेला फरार आरोपीत नामे हारिस उर्फ छोटू अब्दुल अजीज, रा. मुडीयार, यांस पनवेल शहर पोलीस व उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स, वाराणसी यांचेसह संयुक्त कार्यवाहीत अटकेची कारवाई करण्यात आली आहे.. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२, पनवेल व सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पनवेल शहर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे, यांनी पनवेल शहर पोलीस ठाणेकडील खास पथक तयार करून उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स, वाराणसी यांचेकडील उपलब्ध तांत्रिक माहिती तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची माहिती प्राप्त केली. प्राप्त माहितीच्या आधारे पनवेल शहर पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे खास पथक तसेच उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स चे डीवायएसपी शैलेंद्र सिंग, पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव, पोउपनि ज्ञानेंद्र सिंह, पोउपनि शहजादा खॉ, पोहवा दिलीप कश्यप, पोशि रविशंकर सिंह यांचेसह संयुक्त कार्यवाही करून आरोपीत यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीला अटक केल्यानंतर त्याचेकडे तपास केला असता, सदरील आरोपीत हा मागील सुमारे २ महिन्यांपासून नवी मुंबई मध्ये ओला, उबेर या कंपनीमध्ये स्वतःकडे कोणताही अधिकृत वाहन चालकाचा परवाना नसताना देखील त्याचे भावाचे वाहन चालकाचा परवाना व नाव वापरून चालक म्हणून नोकरी करीत असल्याचे दिसून आले आहे. सदरची कामगीरी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह. पोलीस आयुक्त संजय मोहिते, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - २ पनवेल पंकज डहाणे, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग अशोक राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे नितिन ठाकरे, सपोनि प्रकाश पवार, पोउपनि विनोद लभडे, पोहवा नितीन वाघमारे, पोहवा अविनाश गंथडे, पोहवा यशवंत झाजम, पोना अशोक राठोड, पोना माधव शेवाळे, पोना मिथून भोसले, पोना पाटील, पोना पारधी, पोशि संतोष दाहिजे, पोशि कांबळे व पोलीस मित्र राहुल राठोड यांनी केली.
Comments
Post a Comment