केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाने वाचन प्रेरणा दिना निमीत्त स्वामी विवेकानंद लिखीत "स्फुर्ति प्रदवचने सफलतेचे रहस्य" या पुस्तकाचे केले समुह वाचन वाचनालयाने पुस्तके दिली शाळेला भेट
केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाने वाचन प्रेरणा दिना निमीत्त स्वामी विवेकानंद लिखीत "स्फुर्ति प्रदवचने सफलतेचे रहस्य" या पुस्तकाचे केले समुह वाचन
वाचनालयाने पुस्तके दिली शाळेला भेट
(म्हसळा प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयती निमीत्त वाचन प्रेरणा दिनाचे दिवशी म्हसळा न्यू इंग्लीश स्कूलच्या विद्यार्थ्यानी स्वामी विवेकानंद लिखीत "स्फुर्ति प्रदवचने सफलतेचे रहस्य '"या पुस्तकाचे केले सामुदायीक वाचन यावेळी केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाने वाचन प्रेरणा दिना निमीत्त स्वामी विवेकानंद लिखीत "स्फुर्ति प्रदवचने सफलतेचे रहस्य या विषयी पुस्तके शाळेला भेट दिली हे शालेय विद्यार्थी आणि वाचन संस्कृती असे अतूट नाते आहे याची जाणीव करून दिल्याचे मत वाचनालयाचे संचालक सुनिल उमरोटकर यानी या वेळी मांडले. कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे,सचिव अशोक काते, ए.आर. मेमन.न्यू इंग्लिश स्कूल म्हसळाचे शिक्षक डी. सी. आमले, शिक्षिका संगीता शिर्के ,तालुका कृषि अधिकारी राजेंद्र ढंगारे ,कल्पना शेळके , ग्रंथपाल उदय करडे .सायली चोगुले, प्राची मेंदडकर ,विदयार्थीनी संध्या पवार , रिंकू राजपूत विद्यार्थी स्वराज बनकर , वेन्दात दिवेकर यानी आणि अन्य विद्याथ्यानी स्वामी विवेकानंद लिखीतस्फुर्ति प्रदवचने 'सफलतेचे रहस्य ' या पुस्तकाचे समुह वाचन केले. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल व वाचनालयानी पालखी आणि ढोल ताशाचे पथकानी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांची दिंडी या परिसरात काढली, गटविकास आधिकारी बाळासाहेब भोगे, बालविकास प्रकल्प कर्मचारी यानी पालखीचे पूजन आणि कार्यक्रमाचे कौतुक केले.
फोटों
Comments
Post a Comment