मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीला पनवेल तालुका पोलीस ठाण्याने केली अटक
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीला पनवेल तालुका पोलीस ठाण्याने केली अटक
पनवेल (संजय कदम): मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीला पनवेल तालुका पोलीस ठाण्याने केली मुद्देमालासह अटक केली आहे.
यावेळी दयाशकर् जगदीश नारायण मिश्रा हे त्यांचे ताब्यातील ट्रकने पुणे ते जेएनपीटी असा वाहतुक प्रवास करीत असतांना पुणे - मुंबई एक्सप्रेस हायवे, पनवेल एक्झीट जवळ, रस्त्यालगत ट्रक उभा करून हे लघूशंके करीता खाली उतरले असता 4 अनोळखी इसमांनी फिर्यादीस हाताचे ठोश्या बुक्क्याने मारहाण करुन त्यांच्याकडील 7000 रोख रक्कम, 5000 रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल, आधार कार्ड, वाहन चालक परवाना असे जबरीने चोरी करुन पळून गेले अशा आशयाची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच प्रस्तूत गुन्हयाच्या तपासादरम्यान आरोपीच्या वर्णनाव्यतिरिक्त इतर कोणताही धागादोरा तसेच घटनास्थळावर कोठेही सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध नसतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय गळवे व डी.बी. पथकाने तपास सुरु केला. त्या दरम्यान सपोनि गळवे यांना गुप्त बातमीदारामार्फत खबर प्राप्त झाली की, नमुद गुन्हयात सहभाग असलेले आरोपी हे वणवेवाडी व लिंबोड दांडवाडी, पोस्ट तालुका खालापूरयेथील राहणारे आहेत. त्वरीत बातमीस दुजोरा मिळणेकरीता समांतर तांत्रीक तपासाचे मदतीने सदर गुन्ह्यातील आरोपी मंगेश भाऊ पवार (वय 27), अविनाश मारुती धारपवार, (वय 21) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांचेकडून गुन्हयातील जबरीने चोरी केलेले 5000 रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल व रोख 6000 हजार रुपये असा एकूण 11,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात पोलीसांना यश प्राप्त झालेले आहे. सदर टोळीने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे व जुना मुंबई पुणे हायवेवरील तळेगाव, कामशेत, पुणे परिसरात अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केल्याची स्वखुशीने कबुली दिलेली असून त्या अनुशगाने तपास करुन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. यातील अटक आरोपी मंगेश भाऊ पवार याचा पुर्वइतिहास पडताळणी केली असता त्याच्यावर ९ गुन्हे दाखल आहेत. आरोपींतांच्या दोन साथीदारांची नावे निश्पन्न झाले असून शोध घेत आहोत. दरम्यान सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय मोहिते, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पनवेल पंकज डहाणे, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग अशोक राजपुत यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्षन व दिलेल्या सुचनांमुळे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या टोळीचा बिमोड करण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगदीश शेलकर, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक संजय गळवे, सहा. पोलीस निरीक्षक निलेश फूले, पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपूत, पोहवा विकास साळवी, पोहवा सतिश तांडेल, पोहवा विजय देवरे, पोहवा महेष धुमाळ, पोहवा सुनिल कुदळे, पोशि तुकाराम भोये, पोशि आकाश भगत पोशि भिमराव खताळ व पोशि राजकुमार सोनकांबळे, पोशि विद्या गायकवाड यांनी पार पाडलेली आहे.
फोटो: एक्स्प्रेस हायवे दरोडा टोळी
Comments
Post a Comment