जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचालित मराठी मध्यामिक शाळा वरवठणे- आगरवाडा शाळेतस्वछता गृहाचे नूतनीकरण
जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचालित मराठी मध्यामिक शाळा वरवठणे- आगरवाडा शाळेतस्वछता गृहाचे नूतनीकरण
म्हसळा :
जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचालित मराठी मध्यामिक शाळा वरवठणे- आगरवाडा शाळेत दिनांक:-29/10/2023 रोजी श्री सद्गुरु एज्युकेशन वेल्फेअर ट्रस्ट दादर मुंबई मार्फत स्वच्छ्ता गृहाचे नूतनकरणासाठी निधी उपलब्ध करून देणारे *मा. श्री सतीश भाई पै यांच्या शुभहस्ते उद्घाटन करणेत आले यावेळी रायगड भूषण पुरस्कृत थोर समाजसेवक श्रीकृष्णा महाडिक तसेच संस्थेचे संस्थापक मा. श्री महादेव पाटील आणि संचालक श्री दिलीप जी कांबळे आणि मुख्याध्यापक कांबलेकर सर तसेच सुतार सर, कांबळे सर म्हस्के सर आदी उपस्थित होते मा. पाटील साहेबानी पुष्पगुच्छ देवून मान्यवर श्री सतीश पै साहेबांचे आणि कृष्णाजी महाडिक साहेबांचे स्वागत केले यावेळी मान्यवर सतीश साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करताना, मान्यता असलेल्या college ला पूनरसंजीवनी देवून कॉलेज चालविणे याची जबाबदारी घेण्याचे आश्वस्त केले आणि 20 वर्ष विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना आणि शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांना एकत्रित महिना 10000/- मानधन देण्याचे कबूल केले. पाटील साहेबांनी शाळेचा इतिवृत्त थोडक्यात सांगितला. शेवटी कांबळेकर सरांनी आभार व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप केला
Comments
Post a Comment