पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधुम सुरू आहे. त्या अंतर्गत न्हावे ग्रामपंचायतीमधील प्रचार अंतिम टप्प्यात


पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधुम सुरू आहे. त्या अंतर्गत न्हावे ग्रामपंचायतीमधील प्रचार अंतिम टप्प्यात

 पनवेल : भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसप्रणित उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावे-न्हावेखाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत विजयाची खात्री दिली. 

या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासाठी विरेंद्र पाटील, तर सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक 1मधून शैलेश पाटील, जॉर्ज मिनिजेस, अक्षदा भोईर; प्रभाग क्रमांक 2मधून राजेश म्हात्रे, रंजना पाटील, सुनिता भोईर; प्रभाग क्रमांक 3मधून सविता ठाकूर, जागृती भोईर; प्रभाग क्रमांक 4मधून सागर ठाकूर, नरेश मोकल, ललिता ठाकूर उभे आहेत. यांच्या प्रचारासाठी न्हावे परिसरात रविवारी प्रचार रॅली काढण्यात आली. या वेळी मतदारांपर्यत्त पोहचून उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावे-न्हावेखाडीच्या उमेदवारांच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

या वेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा चिटणीस रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, म्हसेश्वर मंदिर कमिटी अध्यक्ष सी. एल. ठाकूर, सागर ठाकूर, चंद्रकांत भोईर, माजी उपसरपंच किरण पाटील, अरुणशेठ ठाकूर, जे. बी. म्हात्रे, किशोर भोई, दिपक भोईर, राजेश म्हात्रे, शैलेश पाटील, नितीन भोईर, तुषार भोईर, दीपक भोईर, चंद्रकात पाटील, मिनाक्षी पाटील, रंजना घरत, वासंती भोईर, शोभा भोईर, जागृती म्हात्रे, सविता ठाकूर, संदीप म्हात्रे, केतन बेंद्रे, रंजना पाटील आदी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर