"पश्चिम विभागीय पॉवरलिफ्टिंग "स्पर्धेत रायगडला दोन सुवर्णपदके




"पश्चिम विभागीय पॉवरलिफ्टिंग

"स्पर्धेत रायगडला दोन सुवर्णपदके

पनवेल (रायगड मत)

27 ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये फोंडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया नॉर्थ गोवा येथे राष्ट्रीय सब ज्युनिअर ज्युनिअर ,सीनियर,(पुरुष व महिला) पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून रायगड जिल्ह्याचे ज्युनिअर पुरुष 53 किलो वजनी गटात कुणाल पिंगळे (लोखंडे जिम ,खोपोली )याने एकूण 415 किलो वजन घेतले त्यामध्ये स्कॉट प्रकारात 145 किलो बेंच प्रेस मध्ये 95 किलो आणि डेडली प्रकारात 175 किलो वजन घेतलेआणि सुवर्णपदक प्राप्त केले. 

       सब ज्युनिअर 83 किलो वजनी गटात अथर्व लोदी (संसारे फिटनेस पेण) याने 535 किलो वजन घेऊन सुवर्णपदक प्राप्त केले. अथर्व याने स्कॉट प्रकारात 192.5 बेंच मध्ये 100 किलो आणि डेडलीफ्ट मध्ये 242.5 असे वजन घेतले. कुणाल पिंगळे आणि अथर्व लोधी यांच्या यशाबाबत पॉवर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे अध्यक्ष गिरीश वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, तसेच सहसचिव सचिन भालेराव, खजिनदार राहुल गजरमल आणि सर्वश्री माधव पंडित सुभाष टेंबे संदीप पाटकर आदींनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग चे सचिव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त "संजय प्रतापराव सरदेसाई"यांनी सुद्धा खेळाडूंना धन्यवाद दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर